spot_img
spot_img

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; आंतरराष्ट्रीय नेमबाज संभाजी पाटील काळाच्या पडद्याआड

झुंजार सेनापती l मुंबई
मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर तालुक्यात आज सकाळी भीषण अपघात झाला. भरधाव फॉर्च्युनर कारने ट्रकला दिलेल्या जोरदार धडकेत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नेमबाज संभाजी शिवाजी झणझण पाटील (वय २७) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे सहकारी प्रणय प्रशांत चौधरी (वय २२) गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील आणि चौधरी पुण्याहून गुजरातकडे जात होते. सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास मनोरजवळील दुर्वेश गावाच्या हद्दीत चौधरी कार चालवत असताना भरधाव वेगात वाहन एका मार्गिकेतून दुसऱ्या मार्गिकेत नेताना समोरून येणाऱ्या हायवा ट्रकचा अंदाज न आल्याने भीषण धडक झाली. अपघात इतका भीषण होता की आलिशान कारचा पुढील भाग अक्षरशः चेंदामेंदा झाला.
अपघातानंतर महामार्ग पोलिस आणि मनोर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात हलवले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संभाजी पाटील यांना तपासून मृत घोषित केले. प्रणय चौधरी यांच्यावर उपचार सुरू आहेत.
संभाजी पाटील हे बालेवाडी क्रीडा संकुलात क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मनोर पोलिसांनी दिली.

Related Articles

अमृत’च्या माध्यमातून ईव्ही चार्जिंग स्टेशन व्यवसायाला चालना

झुंजार सेनापती l मुंबई, दि. १ : हरित ऊर्जा, स्वच्छ पर्यावरण आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत),...

Kako tiki taka casino promo code môže zmeniť váš herný zážitok

V tomto článku sa pozrieme na to, ako môže tiki-takacasino.sk promo kód zmeniť váš herný zážitok. Zameriame sa na výhody, ktoré ponúka, ako ho...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!