spot_img
spot_img
spot_img

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; आंतरराष्ट्रीय नेमबाज संभाजी पाटील काळाच्या पडद्याआड

झुंजार सेनापती l मुंबई
मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर तालुक्यात आज सकाळी भीषण अपघात झाला. भरधाव फॉर्च्युनर कारने ट्रकला दिलेल्या जोरदार धडकेत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नेमबाज संभाजी शिवाजी झणझण पाटील (वय २७) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे सहकारी प्रणय प्रशांत चौधरी (वय २२) गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाटील आणि चौधरी पुण्याहून गुजरातकडे जात होते. सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास मनोरजवळील दुर्वेश गावाच्या हद्दीत चौधरी कार चालवत असताना भरधाव वेगात वाहन एका मार्गिकेतून दुसऱ्या मार्गिकेत नेताना समोरून येणाऱ्या हायवा ट्रकचा अंदाज न आल्याने भीषण धडक झाली. अपघात इतका भीषण होता की आलिशान कारचा पुढील भाग अक्षरशः चेंदामेंदा झाला.
अपघातानंतर महामार्ग पोलिस आणि मनोर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात हलवले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संभाजी पाटील यांना तपासून मृत घोषित केले. प्रणय चौधरी यांच्यावर उपचार सुरू आहेत.
संभाजी पाटील हे बालेवाडी क्रीडा संकुलात क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मनोर पोलिसांनी दिली.

Related Articles

मुंबईकरांच्या सेवेसाठी लवकरच वंदे मेट्रोच्या अत्याधुनिक एसी लोकल ट्रेन

झुंजार सेनापती l मुंबई मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरी लोकल सेवेच्या आधुनिकीकरणाला वेग आला असून लवकरच वंदे मेट्रोच्या अत्याधुनिक एसी लोकल गाड्या मुंबईत दाखल होणार आहेत....

एसटी कर्मचारी संघटना पुन्हा आक्रमक

झुंजार सेनापती l मुंबई  वेतनवाढीचा फरक आणि थकीत मासिक भत्त्याच्या मुद्द्यावरून एसटी कर्मचारी संघटना पुन्हा आक्रमक झाल्या असून त्यांनी राज्य सरकारला थेट अल्टिमेटम दिला आहे....

ताज्या बातम्या

error: Content is protected !!