spot_img
spot_img

धुळ्यात लग्नसोहळा ठरला रक्तरंजित; चाकू हल्ल्यात तिघांची निर्घृण हत्या

झुंजार सेनापती l धुळे : क्षुल्लक कारणावरून विवाह सोहळ्यात झालेल्या वादाचे रूपांतर भीषण हाणामारीत होऊन तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना  जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील घोडेमाल गावात घडली. या प्रकरणी वऱ्हाडींपैकी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुरुवारी सकाळी हा प्रकार घडला.
घोडेमाल येथील विज गोसावी यांच्या मुलीचा विवाह सोहळा होता. त्यासाठी वऱ्हाडी गुजरातमधील सोनगड येथून दोन दिवस आधीच दाखल झाले होते. विवाह सुरू होण्यापूर्वी मंडपात दोन्ही पक्षांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. काही वेळातच या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.
अचानक तीन-चार जणांनी वधूपक्षातील मंडळींवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात सुरेश गिरीगोसावी (५०), साहिल गोसावी (३०) आणि देवेंद्र पवार (३०) यांच्यावर गंभीर वार झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. सागर गोसावी व अन्य एक जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेनंतर विवाह मंडपातून पळ काढणाऱ्या कांतीलाल गोसावी, जसवंत गोसावी आणि वाहनचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

मावळला मेट्रोची चाहूल? विकासाला नवी दिशा मिळणार!

झुंजार सेनापती l प्रतिनिधी l वडगाव मावळ  पुणे महानगर प्रदेशातील झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, औद्योगिक विस्तार आणि पर्यटनाचा वेग लक्षात घेता मावळ तालुक्यासाठी मेट्रो प्रकल्पाची...

महावितरणचे विभाजन शेतकरी, उद्योगांसाठी स्वतंत्र वीज कंपन्या

झुंजार सेनापती l प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) कंपनीचे औद्योगिक, वाणिज्यिक, घरगुती व इतर सर्व बिगर कृषि ग्राहकांसाठीची वितरण संस्था आणि कृषि ग्राहकांना...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!