झुंजार सेनापती l मुंबई (प्रतिनिधी) विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्षातील महाविकास आघाडीने बहिष्कार टाकत सरकारवर तीव्र हल्ला चढवला. पाशवी बहुमताच्या जोरावर सत्तेत आलेले महायुती सरकार लोकशाही आणि संविधानाचा सन्मान करत नाही, असा आरोप करत “घटनेचा आदर आणि लोकशाहीची सभ्यता न पाळणाऱ्या सरकारच्या चहापानाला आम्ही जाणार नाही,” अशी भूमिका आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट केली.
मंत्रालयाजवळील शिवालय येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे बोलत होते. “सत्ताधाऱ्यांचा काळा चहा पिण्यापेक्षा त्यांच्या काळ्या धंद्यांविरोधात आवाज उठवणे आम्हाला अधिक महत्त्वाचे वाटते,” असा इशारा त्यांनी दिला.
महायुती सरकारच्या कामकाजावर टीका करताना त्यांनी, “हे सरकार म्हणजे गंमतजंमतच आहे. स्वतःला ‘इन्फ्रा मॅन’ म्हणवणाऱ्यांनी राज्यातील एक तरी प्रकल्प व्यवस्थित पूर्ण करून दाखवावा,” असे आव्हान दिले.



