spot_img
spot_img

‘शिक्षणाच्या पंढरी’त दहशत! इंटरनॅशनल शाळेतील विद्यार्थ्यांना वेळुच्या काठीने अमानुष मारहाण

झुंजार सेनापती l अहमदपूर (जि. लातूर)  ‘शिक्षणाची पंढरी’ म्हणून ओळख असलेल्या अहमदपूरमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारी घटना उघडकीस आली आहे. थोरलेवाडी येथील  क्राइस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या च्या वसतिगृहात 30 ते 32 विद्यार्थ्यांना वेळूच्या काठीने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला असून, परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
घटना 21 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास घडली. आरोपी उज्वल प्रकाश सोनी (रा. बैतुल, मध्य प्रदेश) याला आपल्या मोटारसायकलचे नुकसान विद्यार्थ्यांनी केल्याचा संशय होता. या संशयातूनच त्याने संतापाच्या भरात विद्यार्थ्यांना अश्लील शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मारहाण करताना “मी पुढे या शाळेचा प्राचार्य होणार आहे, तेव्हा तुम्हाला दाखवतो,” अशी धमकीही त्याने दिल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शाळा प्रशासनाच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
या प्रकरणी शाळेचे प्राचार्य जैबाबेरला प्रपीन नाडर (वय 42) यांनी अहमदपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपीविरुद्ध बीएन एस 2023 अंतर्गत कलम 118(1), 115(2), 352, 351(2)(3) तसेच बालन्याय अधिनियम 2015 मधील कलम 75 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक स्मिता जाधव तपास करत आहेत. जखमी विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात आले असून त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, या घटनेमुळे अहमदपूरच्या शैक्षणिक प्रतिमेला धक्का बसला असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. पालकांनी दोषींवर कठोर कारवाई करून अशा घटना पुन्हा घडू नयेत, अशी मागणी केली आहे.

Related Articles

Hoe je slimmer kunt spelen en winnen bij Vegas Hero Casino online

In dit artikel bespreken we praktische strategieën en tips om slimmer te spelen en je kansen op winst te vergroten bij het Vegas Hero...

मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजना अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा!

झुंजार सेनापती l मुंबई मत्स्यव्यवसाय विभागाचा निधी प्रभावीपणे खर्च होण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावे. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेवर विशेष भर देऊन लाभार्थ्यांची संख्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!