spot_img
spot_img

पाटबंधारे विभागाच्या निर्णयाविरोधात मच्छीमार आक्रमक

धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा

झुंजार सेनापती l मुंबई 

गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ यांच्या अखत्यारीतील विविध तलावांचे मत्स्य ठेके रद्द करण्याचा आदेश नुकताच जारी करण्यात आला आहे. या निर्णयाविरोधात मराठवाड्यातील नोंदणीकृत मच्छीमार सहकारी संस्था आक्रमक झाल्या असून, एकत्रित लढा उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मराठवाडा पाटबंधारे विभागाने काढलेला हा आदेश तत्काळ मागे घ्यावा आणि तलावांचे मत्स्य ठेके पूर्वीप्रमाणे मत्स्य व्यवसाय खात्याकडेच कायम ठेवावेत, अशी मागणी संस्थांनी केली आहे. या संदर्भात विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यात आले असून, मागण्या मान्य न झाल्यास धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
संघटनेचे रत्नाकर मेंढरे, पन्नालाल बिरुटे, नीलेश लेहरे, तुकाराम वानखेडे,शफिक शेख यांनी संयुक्त निवेदनाद्वारे सांगितले की, या निर्णयामुळे हजारो मच्छीमार कुटुंबांच्या उपजीविकेवर परिणाम होणार आहे. शासनाने तत्काळ हस्तक्षेप करून हा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.

Related Articles

एक महिन्यात मराठी शिका अन्यथा बॅज निलंबित!

झुंजार सेनापती | मुंबई महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहने चालविणाऱ्या चालकांना प्रवाशांशी सुसंवाद साधता यावा, यासाठी व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. मराठीचे ज्ञान...

शरद पवारांच्या खासदारांनी घेतली मोदींची भेट रेल्वेपासून बिबट्यापर्यंतच्या प्रश्नांवर चर्चा

⬤ झुंजार सेनापती l नवी दिल्ली  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!