spot_img
spot_img
spot_img

मुंबईतील वाढत्या प्रदूषणावरून आदित्य ठाकरे यांचा सरकारवर जोरदार हल्ला

मुंबई | प्रतिनिधी
मुंबई शहरातील वाढत्या वायुप्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकार तसेच मुंबई महानगरपालिका प्रशासनावर टीका केली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्न असताना ठोस उपाययोजना होत नसल्याचे त्यांनी नमूद केले.
विधान भवन परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ठाकरे म्हणाले की, मुंबईतील हवेचा दर्जा खालावत असून सर्दी, खोकला व श्वसनविकारांच्या तक्रारी वाढत आहेत. अशा परिस्थितीत केवळ नागरिकांनी मास्क वापरणे हा उपाय ठरू शकत नाही. प्रशासनाने व्यापक आणि परिणामकारक पावले उचलणे गरजेचे आहे.
मुंबईत परदेशी मान्यवर किंवा व्हीआयपी भेटींच्या वेळी रस्त्यांची स्वच्छता, वाहतूक नियंत्रण आणि इतर व्यवस्थापन तत्परतेने केले जाते. मग सामान्य नागरिकांसाठीही तितक्याच तत्परतेने उपाययोजना का केल्या जात नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
प्रदूषण नियंत्रणासाठी खासगी बांधकाम प्रकल्पांना किमान एक आठवड्याची तात्पुरती स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच शहरातील विविध वॉर्डनिहाय बांधकामांचे वेळापत्रक निश्चित करून धूळ नियंत्रणाच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सुचविले.
मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असून तातडीने समन्वित कृती आराखडा राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles

हाऊसिंग सोसायट्यांत मेंटेनन्स निधीवर संशयाची सावली; गैरव्यवहारांच्या तक्रारींमध्ये वाढ

मुंबई : हाऊसिंग सोसायटीच्या मेंटेनन्स फंडातील गैरव्यवहारांच्या तक्रारी वाढताना दिसत आहेत. दरमहा सदस्यांकडून वसूल होणारा मेंटेनन्स निधी लिफ्ट, सुरक्षा, स्वच्छता, पाणी, वीज, दुरुस्ती आदी...

दाभाडी सामूहिक बलात्कार प्रकरणी पाच जणांना २० वर्षे सक्तमजुरी

झुंजार सेनापती | जालना  दाभाडी (ता. बदनापूर) येथे विवाहितेवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी जालना जिल्हा व सत्र न्यायालय यांनी पाच आरोपींना प्रत्येकी २० वर्षे सक्तमजुरी...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!