spot_img
spot_img

दाभाडी सामूहिक बलात्कार प्रकरणी पाच जणांना २० वर्षे सक्तमजुरी

झुंजार सेनापती | जालना 
दाभाडी (ता. बदनापूर) येथे विवाहितेवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी जालना जिल्हा व सत्र न्यायालय यांनी पाच आरोपींना प्रत्येकी २० वर्षे सक्तमजुरी आणि ६० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. २८ जुलै २०२२ रोजी रात्री पीडितेला फसवून एका ढाब्यावर नेऊन आरोपींनी अत्याचार केल्याचे न्यायालयाने मान्य केले.
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश कुपेश विजय मोरे यांनी सरकार पक्षाचा युक्तिवाद व सात साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य धरत हा निकाल दिला. संदीप कारभारी कोल्हे, दत्तू कुशाभाऊ खमाटे, बाबासाहेब संतोष कोल्हे, लक्ष्मण बाबुराव सोरमार आणि सुंदरराव किसनराव कोल्हे यांना दोषी ठरविण्यात आले.
सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. वर्षा लक्ष्मीकांत मुकीम आणि अॅड. शशांक ढोकरट यांनी काम पाहिले, तर तपास अधिकारी निशा गुणवंत बनसोड यांची साक्षही निर्णायक ठरली.
पीडिता मानसिक आजाराने त्रस्त असली तरी तिचा बुद्ध्यांक ९५ टक्के असल्याचे नमूद करत तिची साक्ष विश्वासार्ह असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. कठोर शिक्षेमुळे जिल्ह्यात या निकालाचे स्वागत होत आहे.

Related Articles

एक महिन्यात मराठी शिका अन्यथा बॅज निलंबित!

झुंजार सेनापती | मुंबई महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहने चालविणाऱ्या चालकांना प्रवाशांशी सुसंवाद साधता यावा, यासाठी व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. मराठीचे ज्ञान...

शरद पवारांच्या खासदारांनी घेतली मोदींची भेट रेल्वेपासून बिबट्यापर्यंतच्या प्रश्नांवर चर्चा

⬤ झुंजार सेनापती l नवी दिल्ली  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!