spot_img
spot_img

बालाघाटावरील अपर तहसील कार्यालयाचा वाद पेटणार

झुंजार सेनापती | मुंबई | प्रतिनिधी
बीड तालुक्यातील चौसाळा येथे अपर तहसील कार्यालय सुरू व्हावे यासाठी आमदार संदीप क्षिरसागर यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.
बीड शहरापासून चौसाळा सुमारे ४० किमी अंतरावर असल्याने नागरिकांना शासकीय कामांसाठी वारंवार बीडला जावे लागते, त्यामुळे वेळ व खर्च वाढत असल्याची बाब त्यांनी मांडली. चौसाळा येथे तातडीने अपर तहसील कार्यालय सुरू करावे, अशी मागणी त्यांनी मंत्री बावनकुळे यांच्याकडे केली आहे.
दरम्यान, नेकनुर येथे अपर तहसील कार्यालय मंजूर झाल्याचे पत्र समाजमाध्यमांवर व्हायरल होत असून स्थानिक नेते याबाबत दावा करत आहेत. त्यामुळे बीड तालुक्यात अपर तहसील कार्यालय नेमके कुठे सुरू होणार  नेकनुर की चौसाळा  यावरून वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.
दोन्ही गावांतील नागरिक व पदाधिकारी आपापल्या बाजूने ठोस भूमिका मांडत आहेत. अंतर, भौगोलिक सोय, लोकसंख्या, महसूल उत्पन्न, बाजारपेठ, मुख्य पोलीस स्टेशन व दळणवळण सुविधा या मुद्द्यांवरून समर्थक आपले दावे भक्कम असल्याचे सांगत आहेत.
या प्रश्नावर स्थानिक राजकारण तापू लागले असून आंदोलन, निवेदने आणि बैठकींची शक्यता वाढली आहे. शासनाने वस्तुनिष्ठ निकषांवर निर्णय घ्यावा, अशी मागणी दोन्ही बाजूंनी होत आहे. अपर तहसील कार्यालयाचा निर्णय हा आता केवळ प्रशासकीय विषय न राहता स्थानिक अस्मिता आणि राजकीय प्रतिष्ठेचा प्रश्न बनू लागल्याचे चित्र आहे.

Related Articles

Tutto quello che devi sapere sul bonus Newgioco per i nuovi giocatori

In questo articolo, esploreremo nel dettaglio il bonus newgioco offerto ai nuovi giocatori. Discuteremo delle diverse tipologie di bonus disponibili, dei requisiti di scommessa,...

Kā x3000 lv piedāvājumi var uzlabot jūsu azartspēļu pieredzi

Šajā rakstā mēs aplūkosim, kā x3000 lv piedāvājumi var būtiski uzlabot jūsu azartspēļu pieredzi. Mēs izpētīsim dažādas bonusu iespējas, bezriska griezienus, un citas priekšrocības,...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!