spot_img
spot_img

भंडारा उत्सवासाठी ‘बाळूमामा’ मंदिर ३ ते ६ मार्चला बंद

झुंजार सेनापती | प्रतिनिधी
महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र आदमापूर येथील सद्गुरु बाळूमामा मंदिर ३ मार्च ते ६ मार्चदरम्यान दर्शनासाठी पूर्णतः बंद राहणार आहे, अशी माहिती देवस्थान समितीने दिली.
७ मार्चपासून सुरू होणाऱ्या वार्षिक भंडारा उत्सवाच्या पूर्वतयारीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असल्याने परिसराचे पावित्र्य राखणे व व्यापक स्वच्छता करणे आवश्यक आहे.
या चार दिवसांत मुख्य मंदिर व गाभारा, अन्नछत्र, भक्तनिवास तसेच देणगी विभाग आदी ठिकाणी स्वच्छता आणि दुरुस्तीची कामे हाती घेतली जाणार आहेत. सर्व व्यवस्था सुरळीत करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
स्वच्छता व तयारीची कामे पूर्ण झाल्यानंतर ७ मार्चपासून भंडारा उत्सवाला दिमाखात सुरुवात होईल आणि त्याच दिवशी मंदिर भाविकांसाठी पुन्हा खुले करण्यात येईल. ३ ते ६ मार्चदरम्यान भाविकांनी मंदिरात येणे टाळावे, असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.

Related Articles

मांजरसुंबा घाटात कुटुंबाला ओलीस ठेवून दरोडा टाकणारे दरोडेखोर जेरबंद

झुंजार सेनापती | मुंबई बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा घाट परिसरात कुटुंबासह प्रवास करणाऱ्या व्यक्तीला अडवून कोयत्याचा धाक दाखवत दरोडा टाकणे, अपहरण करून विविध ठिकाणी बेकायदेशीररीत्या डांबून...

महाराष्ट्रात समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणी प्रक्रियेला सुरवात

झुंजार सेनापती | मुंबई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषणा करत राज्यात समान नागरी कायद्याचा (UCC) मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!