spot_img
spot_img

उजनी धरणात ‘हेलिकॉप्टर’ माशांचा विळखा; मत्स्यसंपदा, पर्यावरण आणि मच्छीमारांसमोर संकट

झुंजार सेनापती l मुंबई
दक्षिण अमेरिकेतील ॲमेझॉन नदी परिसरातील सकरमाउथ अर्थात ‘हेलिकॉप्टर’ मासा आता उजनी धरणासह भीमा नदीलगतच्या विविध जलस्रोतांमध्ये झपाट्याने वाढत आहे. फिश टँकमध्ये छंद म्हणून पाळले जाणारे हे परदेशी मासे जलाशयात सोडण्यात आल्याने आता स्थानिक जैवविविधता आणि मत्स्यसंपदेसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे.
या माशांची प्रजनन क्षमता अधिक असल्याने त्यांची संख्या वेगाने वाढत आहे. परिणामी देशी तसेच कार्प जातींच्या माशांवर परिणाम होत असून मच्छीमारांनाही मोठा फटका बसत आहे. जाळ्यात अडकल्यानंतर त्यांच्या तीक्ष्ण दातांमुळे जाळी फाटत असल्याने मच्छीमारांचे आर्थिक नुकसान वाढत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
अभ्यासानुसार हे मासे नदी, तलाव आणि जलाशयांच्या काठांवर बिळे तयार करतात. त्यामुळे धरणे, बंधारे आणि जलस्रोतांच्या मजबुतीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. हे मासे खाण्यासाठी वापरले जात नसले तरी त्यांचा फिश ऑइल आणि खत निर्मितीसाठी उपयोग होत असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, सकर माशांचा वाढता उपद्रव लक्षात घेऊन विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून आतापर्यंत १३ टनांहून अधिक मासे संकलित करण्यात आले आहेत. मच्छीमारांना या मोहिमेत सहभागी करून प्रोत्साहनपर बक्षिसे आणि प्रमाणपत्रेही दिली जात आहेत. तज्ज्ञांनी या परदेशी प्रजातीचा वेळीच बंदोबस्त न केल्यास उजनी परिसरातील जैवविविधतेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

Related Articles

Hoe je slimmer kunt spelen en winnen bij Vegas Hero Casino online

In dit artikel bespreken we praktische strategieën en tips om slimmer te spelen en je kansen op winst te vergroten bij het Vegas Hero...

मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजना अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा!

झुंजार सेनापती l मुंबई मत्स्यव्यवसाय विभागाचा निधी प्रभावीपणे खर्च होण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावे. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेवर विशेष भर देऊन लाभार्थ्यांची संख्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!