spot_img
spot_img

पेपरफुटीमुळे रद्द झालेल्या नीट ची नवी तारीख जाहीर!

झुंजार सेनापती l नवी दिल्ली
३ मे रोजी घेण्यात आलेली आणि पेपरफुटीमुळे रद्द करण्यात आलेली नीट यूजी परीक्षा आता येत्या २१ जून रोजी घेण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री Dharmendra Pradhan यांनी पत्रकार परिषदेत केली. विद्यार्थ्यांना कमीत कमी त्रास होईल आणि परीक्षा प्रक्रिया पारदर्शक राहील यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
शिक्षण क्षेत्रातील गैरप्रकारांमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये आणि अयोग्य उमेदवारांना संधी मिळू नये, या उद्देशाने ३ मे रोजी घेण्यात आलेली नीट परीक्षा रद्द करण्याचा निर्णय संबंधित संस्थेकडून घेण्यात आला होता.
पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर परीक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, नव्याने होणाऱ्या परीक्षेत अधिक कडक आणि सुरक्षित व्यवस्था ठेवण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

Related Articles

मांजरसुंबा घाटात कुटुंबाला ओलीस ठेवून दरोडा टाकणारे दरोडेखोर जेरबंद

झुंजार सेनापती | मुंबई बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा घाट परिसरात कुटुंबासह प्रवास करणाऱ्या व्यक्तीला अडवून कोयत्याचा धाक दाखवत दरोडा टाकणे, अपहरण करून विविध ठिकाणी बेकायदेशीररीत्या डांबून...

महाराष्ट्रात समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणी प्रक्रियेला सुरवात

झुंजार सेनापती | मुंबई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत घोषणा करत राज्यात समान नागरी कायद्याचा (UCC) मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!