spot_img
spot_img

नागरिकांच्या तक्रारींसाठी एफडीए सज्ज; हेल्पलाईन व ई-मेल जाहीर

झुंजार सेनापती l मुंबई
अन्नपदार्थांमध्ये भेसळ होत असल्याची शंका असल्यास आता नागरिकांना थेट प्रशासनाकडे तक्रार करता येणार आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) नागरिकांच्या तक्रारी तत्काळ नोंदविण्यासाठी टोल-फ्री हेल्पलाईन आणि ई-मेल सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
नागरिकांनी कोणत्याही खाद्यपदार्थामध्ये भेसळ, निकृष्ट दर्जा, बनावट उत्पादन किंवा आरोग्यास हानीकारक घटक आढळल्यास त्वरित तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
तक्रार नोंदविण्यासाठी संपर्क
☎️ टोल-फ्री क्रमांक : १८००२२२३६५
📧 ई-मेल : [email protected]
अन्नपदार्थातील भेसळीमुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा प्रकारांची माहिती मिळताच संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेऊन तक्रारी नोंदवाव्यात, असे अन्न व औषध प्रशासन विभागाने स्पष्ट केले आहे

Related Articles

विठुरायाच्या दर्शनासाठी जागतिक दर्जाच्या सुविधा

⬤ झुंजार सेनापती l मुंबई आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी 'पंढरपूर कॉरिडॉर' प्रकल्पाची...

विठुरायाच्या दर्शनासाठी आधुनिक सुविधा; पंढरपूर कॉरिडॉर उभारणार

⬤ झुंजार सेनापती l पंढरपूर आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक मानाचे वारकरी बाबासाहेब माधव माने व प्रभावती...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!