spot_img
spot_img

शरद पवारांच्या खासदारांनी घेतली मोदींची भेट रेल्वेपासून बिबट्यापर्यंतच्या प्रश्नांवर चर्चा

⬤ झुंजार सेनापती l नवी दिल्ली 

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या गटनेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्प पूर्वीच्या मार्गानेच करण्याची मागणी करण्यात आली.

जीएमआरटीच्या अडचणी, जुन्नर-आंबेगाव-खेड-शिरूरमधील मानव-बिबट संघर्ष, ‘इंद्रायणी मेडिसिटी’, जुन्नर येथे राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र तसेच शिवनेरी पायथ्याशी ‘शिवसंस्कार सृष्टी’ उभारण्याबाबत चर्चा झाली.
महात्मा जोतीराव फुले, सावित्रीमाई फुले, अण्णा भाऊ साठे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न देण्याची मागणीही करण्यात आली. तसेच तळेगाव-चाकण-रांजणगाव औद्योगिक पट्टा न्हावाशेवा बंदराशी जोडण्यासाठी नवीन रेल्वे कॉरिडॉर उभारण्याची मागणी करण्यात आली. सर्व विषयांवर वैयक्तिक लक्ष घालून आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिल्याचे सांगण्यात आले.

Related Articles

Die besten Zahlungsmethoden bei Slotexo Casino Deutschland für schnelle und sichere Transaktionen

In diesem Artikel werden wir die besten Zahlungsmethoden bei Slotexo Casino Deutschland genauer unter die Lupe nehmen. Wir möchten Ihnen die verschiedenen Optionen vorstellen,...

दूध पुन्हा महागले! पिशवीबंद दुधाच्या दरात २ रुपयांची वाढ

⬤ झुंजार सेनापती l मुंबई राज्यातील गाई आणि म्हशीच्या पिशवीबंद दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय राज्यातील प्रमुख खासगी व सहकारी दूध संघांनी...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!