spot_img

समाजाच्या प्रगतीसाठी सदैव कटिबद्ध राहू!

- जयदत्त क्षीरसागर

झुंजार सेनापती | मुंबई 

गोमंतक हिंदू तेली समाजाच्या वतीने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात बिचोलीम येथे पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय तैलिक साहू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर होते. प्रमुख पाहुणे म्हणून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद पांडुरंग सावंत उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, तसेच डॉ. अरुण भस्मे, रजनीश गुप्ता यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून समाजातील एकोपा, बंधुभाव आणि सामाजिक विकासाच्या विविध विषयांवर विचारमंथन करण्यात आले. समाजाची एकजूट अधिक मजबूत करून सर्वांगीण प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाचे आयोजन अनिल वेंगुर्लेकर, कृष्णा डीचोलकर आणि सत्यवान सातरडेकर यांनी केले.

“समाजाच्या एकजुटीसाठी आणि प्रगतीसाठी आपण सदैव कटिबद्ध राहू,” असे प्रतिपादन जयदत्त क्षीरसागर यांनी यावेळी केले.

 

Related Articles

तांडा-वस्त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करा!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई तांडा वस्त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामविकास विभागाने स्वतंत्र तांडा वस्ती विकास प्राधिकरण स्थापन करावे. या प्राधिकरणाच्या माध्यमातून शाळा, अंगणवाडी, रस्ते, पोहोचमार्ग,...

आता प्रत्येक फ्लॅटला मिळणार स्वतंत्र मालकी हक्काचे प्रॉपर्टी कार्ड!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई  राज्यातील मंजूर आणि अधिकृत इमारतींमधील प्रत्येक सदनिकेला स्वतंत्र ओळख आणि मालकी हक्कांचा पूरक अभिलेख मिळणार आहे. यासाठी राज्य शासनाकडून...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!