spot_img
spot_img

राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वेतनाचा आधार!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द

⬤ झुंजार सेनापती l मुंबई
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी शेतकऱ्यांप्रती आपली बांधिलकी जपत दुष्काळी उपाययोजनांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस आपले एक महिन्याचे वेतन मदत म्हणून दिले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी आज हा मदत निधीचा धनादेश सुपूर्द केला.मुख्यमंत्री फडणवीस आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आले असता, त्यांनी राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्या प्रसंगी श्री. बागडे यांनी आपले एक महिन्याचे वेतन दुष्काळ मदतनिधीस दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या मदतीचा स्वीकार केला.

या प्रसंगी इमाव बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, आ.सुहास शिरसाट, आ.अनुराधाताई चव्हाण, महापौर समीर राजूरकर, माजी खा.डॉ.भागवत कराड, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. आदी उपस्थित होते.

Related Articles

बेकायदा सावकारांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; आधी परवाना दाखवा!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई महाराष्ट्रातील बेकायदा सावकारी व्यवसायाला आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. विनापरवाना सावकारांनी प्रॉमिसरी नोटच्या आधारे दिलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी...

संकटात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; फडणवीसांची ग्वाही, उद्योजकांकडून ६.१८ कोटींची मदत!

  ⬤ झुंजार सेनापती l मुंबई दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मराठवाड्यातील उद्योजकांनी पुढाकार घेत आज ६ कोटी १८ लाख रुपयांचा धनादेश दिल्याबद्दल आभार व्यक्त करताना बळीराजाच्या पाठीशी...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!