spot_img
spot_img

विविधता ही भारताची सर्वात मोठी ताकद!

-राज्यपाल जिष्णु देव वर्मा

⬤ झुंजार सेनापती l मुंबई

भारताची भाषा, संस्कृती, रूढी आणि परंपरा वेगवेगळ्या असल्या, तरी भारतीयत्वाची भावना सर्वांना एकत्र बांधते. देशाची विविधता हीच भारताची सर्वांत मोठी ताकद असून सांस्कृतिक देवाणघेवाण आणि परस्पर संवादातून राष्ट्रीय एकात्मता अधिक मजबूत होईल, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्र लोकभवन येथे आठ राज्ये आणि पाच केंद्रशासित प्रदेशांचा स्थापना दिन साजरा करण्यात आला. यावेळी राज्यपाल बोलत होते. आंध्र प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, पंजाब आणि तामिळनाडू या राज्यांसह अंदमान-निकोबार बेटे, चंदीगड, दिल्ली, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरी यांचा स्थापना दिन उत्साहात साजरा झाला.
भारताची राज्ये विविधरंगी फुलांप्रमाणे असून त्यातून देशाचा सुंदर सांस्कृतिक पुष्पगुच्छ साकारला आहे. प्रत्येक राज्याचे राष्ट्रीय प्रगती आणि सांस्कृतिक वारशातील योगदान महत्त्वपूर्ण आहे. विविधतेचा आदर राखत एकमेकांच्या संस्कृतीतून शिकणे आणि एकसंध भारताच्या उभारणीसाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे राज्यपालांनी सांगितले.
सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाला एकसंध केले. आता ‘एक भारत’चे ‘श्रेष्ठ भारत’मध्ये रूपांतर करण्याची सामूहिक जबाबदारी प्रत्येक भारतीयाची आहे. भगवान महावीर, भगवान बुद्ध आणि महात्मा गांधी यांच्या शांतता व अहिंसेच्या विचारांतून जगाला मार्गदर्शन करण्याची क्षमता भारताकडे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात विविध राज्यांच्या पथकांनी भरतनाट्यम, भांगडा, कथ्थक यांसह पारंपरिक लोकनृत्य आणि सांस्कृतिक कलांचे सादरीकरण केले. विविध क्षेत्रांतील मान्यवर, कलाकार, खेळाडू, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थांच्या प्रतिनिधींचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वर्मा फाउंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

Related Articles

महाराष्ट्राला जागतिक शिक्षण- संशोधनाचे केंद्र बनविणार!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई उच्च शिक्षणाचा  उद्देश केवळ पदवी देणे नसून, विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करणे, त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास सक्षम...

फळबागा जगविण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठविणार!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई राज्यात फळबागा असलेल्या एकूण ६ लाख ८५ हजार हेक्टर क्षेत्रापैकी मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात सुमारे २.५ लाख हेक्टर क्षेत्र आहे....

ताज्या बातम्या

error: Content is protected !!