spot_img
spot_img

दुष्काळावर मात करण्यासाठी सरकारचा ‘वॉटर कप’ ॲक्शन प्लॅन!

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती; स्वयंसेवी संस्थांच्या जलसंधारण कामांवर जीआयएसद्वारे नजर

⬤ झुंजार सेनापती l मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासनाने जलसंधारणाच्या कामांना गती देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘वॉटर कप’ स्पर्धा आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून होणाऱ्या मृद व जलसंधारण कामांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली आहे. तसेच कामांचा वेग वाढविण्यासाठी प्रधान सचिव, जलसंपदा विभाग यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती गठित करण्यात आली आहे.
कमी पर्जन्यमानामुळे दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये लोकसहभागातून जलसंधारणाची कामे राबविण्यात येणार असून, त्यांचा नियमित आढावा घेतला जाणार आहे. संबंधित विभागांमध्ये समन्वय साधून ‘वॉटर कप’ची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कार्यकारी समितीवर सोपविण्यात आली आहे.
स्वयंसेवी संस्थांच्या कामांवर जीआयएस, उपग्रह प्रतिमा, मोबाईल आधारित निरीक्षण प्रणाली आणि ऑनलाइन डॅशबोर्डच्या माध्यमातून देखरेख ठेवण्यात येणार आहे. कार्यकारी समितीची महिन्यातून किमान एक बैठक घेऊन कामांचा आढावा घेतला जाणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय २ नोव्हेंबर २०२६ रोजी जारी करण्यात आला आहे.

Related Articles

महाराष्ट्राला जागतिक शिक्षण- संशोधनाचे केंद्र बनविणार!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई उच्च शिक्षणाचा  उद्देश केवळ पदवी देणे नसून, विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करणे, त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास सक्षम...

फळबागा जगविण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठविणार!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई राज्यात फळबागा असलेल्या एकूण ६ लाख ८५ हजार हेक्टर क्षेत्रापैकी मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात सुमारे २.५ लाख हेक्टर क्षेत्र आहे....

ताज्या बातम्या

error: Content is protected !!