spot_img
spot_img

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी २९२ कोटींचे मदत पॅकेज!

३ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना दिलासा; पीक नुकसान आणि शेतजमिनीसाठी निधी मंजूर

⬤ झुंजार सेनापती l मुंबई

अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने २९१ कोटी ९१ लाख ४ हजार रुपयांची मदत मंजूर केली आहे. जून ते ऑगस्ट २०२६ या कालावधीत बाधित झालेल्या शेतकऱ्यांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. यामध्ये पीक नुकसानीसाठी २६२ कोटी ६९ लाख ९५ हजार, तर शेतजमिनीच्या नुकसानीसाठी २९ कोटी २१ लाख ९ हजार रुपयांचा समावेश आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली.
पीक नुकसानीपोटी ३ लाख ९ हजार २८९ शेतकऱ्यांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, कोकण आणि नाशिक विभागांतील बाधित शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. ही मदत थेट लाभ हस्तांतरणाद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
दरम्यान, अतिवृष्टीमुळे शेतजमिनीचे नुकसान झालेल्या ३४ हजार ९८४ शेतकऱ्यांसाठी २९ कोटी २१ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याअंतर्गत ७ हजार ६७५.४० हेक्टर बाधित क्षेत्राचा समावेश आहे. जमीनमालक असलेल्या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दोन हेक्टरच्या मर्यादेत मदत दिली जाणार आहे.
शेतजमिनीतील वाळू, गाळ आणि क्षार काढण्यासाठी तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पात्र नुकसानीसाठी हा निधी वापरता येणार आहे. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांना मिळणारी आपत्ती मदत बँकांनी कर्ज खात्यात किंवा अन्य वसुलीसाठी वळती करू नये, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना देण्याचे निर्देशही शासनाने दिले आहेत.

Related Articles

महाराष्ट्राला जागतिक शिक्षण- संशोधनाचे केंद्र बनविणार!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई उच्च शिक्षणाचा  उद्देश केवळ पदवी देणे नसून, विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करणे, त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास सक्षम...

फळबागा जगविण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठविणार!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई राज्यात फळबागा असलेल्या एकूण ६ लाख ८५ हजार हेक्टर क्षेत्रापैकी मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात सुमारे २.५ लाख हेक्टर क्षेत्र आहे....

ताज्या बातम्या

error: Content is protected !!