spot_img
spot_img

IND vs NZ: वॉशिंग्टन सुंदरमुळे सुनील गावसकरांनी जेवताना फोडली प्लेट, रवी शास्त्रींनी कॉमेंट्री करताना सांगितलं नेमकं काय घडलं?

भारत आणि न्यूझीलंड तिसरा कसोटी सामना वानखेडेवर खेळवला जात आहे. दुसऱ्या दिवसाचा लंच ब्रेक होईपर्यंत भारताने ५ विकेट्स गमावत या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर टीम इंडियाला प्रथम गोलंदाजी करावी लागली.

टीम इंडियाने चांगली गोलंदाजी करत किवी संघाला २३५ धावांवर रोखले. मात्र, या खेळीदरम्यान भारताच्या फिरकीपटूंनी बरेच नो बॉल टाकले, ज्यामुळे भारताचे महान खेळाडू सुनीव गावस्कर संतापले. भारतीय संघाचे माजी खेळाडू आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही या प्रकरणावर ऑन एअर मजा फिरकी घेतली.

न्यूझीलंडविरुद्धच्या मुंबई कसोटीत भारतीय फिरकीपटू रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी अनेक नो बॉल टाकले हे पाहून माजी भारतीय फिरकीपटू सुनील गावस्कर वैतागले होते. सुंदर वारंवार नो बॉल टाकत होता, यादरम्यान कॉमेंट्री करणाऱ्या रवी शास्त्रीने एक मजेशीर प्रसंग शेअर केला. त्यांनी सांगितले की, सुंदरने नो बॉल टाकल्यावर गावस्कर संतापले आणि लंच करताना रागाच्या भरात त्याने एक प्लेट फोडली.

शास्त्री गंमतीने म्हणाले, ‘सुनील गावस्कर जेवत होते. त्यांनी सुंदरचा नो बॉल पाहून प्लेट भिंतीवर फेकली. देवाचे आभार मानतो की ते (सुनील गावसकर) स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करत नव्हते.

Related Articles

मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजना अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा!

झुंजार सेनापती l मुंबई मत्स्यव्यवसाय विभागाचा निधी प्रभावीपणे खर्च होण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावे. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेवर विशेष भर देऊन लाभार्थ्यांची संख्या...

महाराष्ट्राच्या ढोल-ताशाला जागतिक मानांकन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद

झुंजार सेनापती | मुंबई शिक्षण कौशल्य, क्रीडा स्टार्टअप आदी क्षेत्रात युवा पिढीचा सकारात्मक सहभाग आहे. त्यांचा हा सहभाग वाढविण्यासोबतच संपूर्ण मदत देण्यात येईल त्यासोबत स्टार्टअप इकोसिस्टीम...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!