spot_img
spot_img

चहा कमी देत असल्याचे आढळून आले रेल्वे स्टेशन वरील चहा विक्रेत्यांवर कारवाई

झुंजार सेनापती l नवी मुंबई

कोकण विभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या रेल्वे स्थानकावरील स्टॉलवर चहा, खाद्यपदार्थ व इतर वस्तूंची विक्री होत असते. सहनियंत्रक, वैधमापन शास्त्र कोकण विभागचे शिवाजी काकडे, यांच्या सूचनेवरून नूकतिच कारवाई करण्यात आली.

तसेच ठाणे जिल्हयातील कल्याण व ठाणे, पालघर जिल्हयातील वसई, रायगड जिल्हयातील पनवेल व कर्जत, रत्नागिरी  जिल्हयातील चिपळूण व रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्हयातील कुडाळ या रेल्वे स्टेशनवर संबंधित जिल्हा उपनियंत्रकांच्या मार्गदर्शनाखाली चहा, खाद्यपदार्थ व इतर वस्तूंची विक्री करणाऱ्या आस्थापनांवर अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वैधमापन शास्त्र यंत्रणेतील निरीक्षकांनी अचानक भेटी देवून नूकतिच कारवाई करण्यात आली. वैधमापन शास्त्र अधिनियम २००९ मधील तरतूदीन्वये तपासणी केली.

रेल्वे स्टेशनवरील चहा विक्री करणाऱ्या आस्थापनांना १५०/१८० मिली एवढी घोषित प्रमाण असताना तपासणीमध्ये ३० ते ८० मिली एव्हढा चहा कमी देत असल्याचे आढळून आले. अश्या एकूण ७ आस्थापनांवर वैधमापन शास्त्र अधिनियम २००९ मधील तरतूदीन्वये प्रकरण दाखल करण्यात आले. वापरात असलेली तोलन उपकरणे विहित मुदतीत फेर पडताळणी व मुद्रांकन करून न घेतल्यामुळे ०४ प्रकरणे दाखल करण्यात आली. चिपळूण व रत्नागिरी स्टेशन वरील आस्थापनेवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आवेष्टित वस्तूवर नियमातील तरतूदीन्वये आवेष्टनावर घोषवाक्य नमूद न केल्यामूळे प्रकरण दाखल करण्यात आले आहे.अशी माहिती पत्रकान्वय कोकण विभागाचे सह नियंत्रक,वैध मापन शास्त्राचे शिवाजी काकडे यांनी दिली.

Related Articles

Hoe je slimmer kunt spelen en winnen bij Vegas Hero Casino online

In dit artikel bespreken we praktische strategieën en tips om slimmer te spelen en je kansen op winst te vergroten bij het Vegas Hero...

मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजना अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा!

झुंजार सेनापती l मुंबई मत्स्यव्यवसाय विभागाचा निधी प्रभावीपणे खर्च होण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावे. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेवर विशेष भर देऊन लाभार्थ्यांची संख्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!