spot_img
spot_img

पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचे देशी गोवंश संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

२२ जुलै "शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन" म्हणून साजरा होणार

झुंजार सेनापती l मुंबई

राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी देशी गायींच्या संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, दरवर्षी २२ जुलै हा दिवस “शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन” म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे. या निर्णयाचा अध्यादेश राज्य शासनाने निर्गमित केला आहे.

यापूर्वीच देशी गायीस “राज्यमाता–गोमाता” म्हणून घोषित करण्यात आले असून, या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात मराठवाडा विभागात देवणी, लालकंधारी. पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिल्लार, उत्तर महाराष्ट्रात डांगी तर विदर्भात गवळाऊ यांसारख्या देशी गायींच्या जाती आढळतात.

Related Articles

दुष्काळावर मात करण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई मुंबई, दि. २६ : राज्यातील अपुऱ्या पावसामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेल्या ट्रिगर-१ आणि ट्रिगर-२ लागू असलेल्या ३०४ तालुक्यांतील प्रत्येक गावात...

‘तिसऱ्या मुंबई’त १५ लाख रोजगारांचे लक्ष्य!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई रायगड-अलिबाग, दि. २५ : नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र अर्थात नैना परिसराच्या नियोजनबद्ध विकासातून १५ लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!