⬤ झुंजार सेनापती l मुंबई
मुंबई, दि. २६ : राज्यातील अपुऱ्या पावसामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेल्या ट्रिगर-१ आणि ट्रिगर-२ लागू असलेल्या ३०४ तालुक्यांतील प्रत्येक गावात किमान १०० जलशोषक खड्डे तयार करण्यात येणार आहेत. यासोबतच मृद व जलसंधारणाची ११ प्रकारची कामे हाती घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
याबाबतची माहिती मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली. पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे, भूजलपातळी वाढवणे आणि दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना गती देण्यावर भर दिला जाणार आहे.
दुष्काळग्रस्त भागांत पाणीटंचाई कमी करण्यासाठी या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी महत्त्वाची ठरणार आहे.



