spot_img
spot_img

‘तिसऱ्या मुंबई’त १५ लाख रोजगारांचे लक्ष्य!

नैना क्षेत्र ठरणार महाराष्ट्राचे नवे विकास इंजिन

⬤ झुंजार सेनापती l मुंबई
रायगड-अलिबाग, दि. २५ : नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र अर्थात नैना परिसराच्या नियोजनबद्ध विकासातून १५ लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यापैकी पाच लाख रोजगार उच्च वेतनाचे असतील. या रोजगाराच्या संधींमध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य दिले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
पनवेल तालुक्यातील शिरढोण येथे नैना क्षेत्रातील विकासकामांचे भूमिपूजन, विमानतळ जोडणीसाठी उभारण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण पुलांचे लोकार्पण आणि भूधारकांना मालमत्ता पत्रकांचे वाटप करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे परिसराच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार असून, एज्युसिटी, मेडिसिटी, स्पोर्ट्स सिटी, एरोसिटी आणि नॉलेज सिटी यांसारख्या संकल्पनांतून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. रस्ते, पाणीपुरवठा आणि अन्य मूलभूत सुविधांचा विकासही करण्यात येणार आहे.
भूधारकांचे प्रश्न सोडविण्यास शासन कटिबद्ध असून, जमिनीशी संबंधित कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. भूमिपुत्रांच्या हिताचे संरक्षण करूनच नैना क्षेत्राचा विकास केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
‘तिसरी मुंबई’ म्हणून विकसित होणारे नैना क्षेत्र मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे आणि पालघरच्या आर्थिक विकासाला नवी दिशा देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Related Articles

दुष्काळग्रस्त भागात पोषण व आरोग्याच्या काळजीसाठी महिला व बालविकास विभाग सक्रिय

⬤ झुंजार सेनापती l मुंबई निसर्गातील बदल, वाढते तापमान आणि पावसाचा अभाव यामुळे राज्यातील अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीचा परिणाम केवळ...

विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान

⬤ झुंजार सेनापती l मुंबई  महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद, पुणे व नागपूर विभागातील तीन पदवीधर तसेच अमरावती व पुणे विभागातील दोन शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!