spot_img
spot_img

निवडणूक आयोगाच्या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात ३७९ निवडणूक अधिकाऱ्यांचा सहभाग

झुंजार सेनापती l सोमनाथ पाटील

नवी दिल्ली येथील इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रसी अ‍ॅण्ड इलेक्शन मॅनेजमेंट (IIIDEM) येथे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) व पर्यवेक्षकांसाठीच्या १३ व्या प्रशिक्षण सत्राला प्रारंभ झाला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. उत्तर प्रदेश (१११)मध्य प्रदेश (१२८)नागालँड (६७)मेघालय (६६) आणि चंदीगड (७) येथील एकूण ३७९ अधिकारी या प्रशिक्षणामध्ये सहभागी झाले आहेत. गेल्या तीन महिन्यांत नवी दिल्लीत ५,००० पेक्षा अधिक BLO व BLO पर्यवेक्षक यांना निवडणूक आयोगामार्फत प्रशिक्षण देण्यात आले आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी उद्घाटन भाषणात सांगितले कीमतदार यादी तयार करणे आणि निवडणुका पारदर्शकपणे व कायद्याच्या चौकटीत पार पाडणेयाबाबत प्रशिक्षण देणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. यासाठी लोकप्रतिनिधित्व कायदा १९५०१९५१मतदार नोंदणी नियम १९६०निवडणूक आचारसंहिता नियम १९६१तसेच निवडणूक आयोगाने वेळोवेळी जारी केलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहेअसे त्यांनी नमूद केले.

मतदार यादीच्या अंतिम प्रसिद्धीनंतर त्यावर होणाऱ्या अपील प्रक्रियेबाबतही ज्ञानेश कुमार यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी स्पष्ट केले कीजिल्हाधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकारी (कलम २४(अ)) तसेच मुख्य निवडणूक अधिकारी (कलम २४(ब)) यांच्याकडे अपील करता येतेयाची माहिती प्रशिक्षणार्थींनी मतदारांपर्यंत पोहोचवावी.

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे६ ते १० जानेवारी २०२५ दरम्यान पार पडलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SSR) नंतर मेघालयनागालँडमध्य प्रदेशचंदीगड आणि उत्तर प्रदेश येथून कोणतेही अपील प्राप्त झाले नाहीत.

या प्रशिक्षणादरम्यान सहभागी अधिकाऱ्यांना मतदार नोंदणीविविध फॉर्म्सची हाताळणीक्षेत्रीय तपासणी याबाबतीत प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणाद्वारे अधिकाऱ्यांचे IT साधनांचा वापर व व्यवहारज्ञान वाढवण्यावरही भर दिला जाणार आहे. तसेच, EVM आणि VVPAT यंत्रणांबाबत तांत्रिक प्रात्यक्षिके व मॉक पोल्स आयोजित करण्यात आले आहेत.

Related Articles

जीएसटी अधिकारी मृत्यू प्रकरण; मुख्य आरोपी प्रदीप फाटे पुण्यातून अटकेत

झुंजार सेनापती l मुंबई बीड जिल्ह्यातील वस्तू व सेवा कर विभागाचे अधिकारी सचिन नारायण जाधवर यांच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांना महत्त्वाचे यश मिळाले आहे. या प्रकरणातील...

आखाती देशांतील तणाव; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी राज्य सरकार सतर्क

झुंजार सेनापती l मुंबई आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षेबाबत राज्य सरकारने तातडीने पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री Devendra Fadnavis...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!