spot_img
spot_img

निवडणूक आयोगाच्या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात ३७९ निवडणूक अधिकाऱ्यांचा सहभाग

झुंजार सेनापती l सोमनाथ पाटील

नवी दिल्ली येथील इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रसी अ‍ॅण्ड इलेक्शन मॅनेजमेंट (IIIDEM) येथे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) व पर्यवेक्षकांसाठीच्या १३ व्या प्रशिक्षण सत्राला प्रारंभ झाला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. उत्तर प्रदेश (१११), मध्य प्रदेश (१२८), नागालँड (६७), मेघालय (६६) आणि चंदीगड (७) येथील एकूण ३७९ अधिकारी या प्रशिक्षणामध्ये सहभागी झाले आहेत. गेल्या तीन महिन्यांत नवी दिल्लीत ५,००० पेक्षा अधिक BLO व BLO पर्यवेक्षक यांना निवडणूक आयोगामार्फत प्रशिक्षण देण्यात आले आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी उद्घाटन भाषणात सांगितले की, मतदार यादी तयार करणे आणि निवडणुका पारदर्शकपणे व कायद्याच्या चौकटीत पार पाडणे, याबाबत प्रशिक्षण देणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. यासाठी लोकप्रतिनिधित्व कायदा १९५०, १९५१, मतदार नोंदणी नियम १९६०, निवडणूक आचारसंहिता नियम १९६१, तसेच निवडणूक आयोगाने वेळोवेळी जारी केलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.

मतदार यादीच्या अंतिम प्रसिद्धीनंतर त्यावर होणाऱ्या अपील प्रक्रियेबाबतही ज्ञानेश कुमार यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी स्पष्ट केले की, जिल्हाधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकारी (कलम २४(अ)) तसेच मुख्य निवडणूक अधिकारी (कलम २४(ब)) यांच्याकडे अपील करता येते, याची माहिती प्रशिक्षणार्थींनी मतदारांपर्यंत पोहोचवावी.

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, ६ ते १० जानेवारी २०२५ दरम्यान पार पडलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SSR) नंतर मेघालय, नागालँड, मध्य प्रदेश, चंदीगड आणि उत्तर प्रदेश येथून कोणतेही अपील प्राप्त झाले नाहीत.

या प्रशिक्षणादरम्यान सहभागी अधिकाऱ्यांना मतदार नोंदणी, विविध फॉर्म्सची हाताळणी, क्षेत्रीय तपासणी याबाबतीत प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणाद्वारे अधिकाऱ्यांचे IT साधनांचा वापर व व्यवहारज्ञान वाढवण्यावरही भर दिला जाणार आहे. तसेच, EVM आणि VVPAT यंत्रणांबाबत तांत्रिक प्रात्यक्षिके व मॉक पोल्स आयोजित करण्यात आले आहेत.

Related Articles

Die aufregendsten Möglichkeiten, den Springbok Casino Mobile Bonus zu nutzen

In diesem Artikel erkunden wir die faszinierenden Möglichkeiten, wie Spieler den Springbok Casino Mobile Bonus optimal nutzen können. Wir werden die verschiedenen Arten von...

Waarom de Bass Bet APK een must-have is voor gokliefhebbers

In de wereld van online gokken zijn er tal van opties en applicaties beschikbaar voor gokliefhebbers. Een van de meest opvallende is de Bass...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!