spot_img
spot_img

नाशिक कुंभमेळ्यात भाविकांच्या सेवेसाठी हजारो तरुण राहणार कार्यरत

झुंजार सेनापती l मुंबई

आयटीआयमध्ये सुरु होणाऱ्या ‘वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट’ या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून तीर्थक्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणार असून पुढच्या वर्षी नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यात हजारो प्रशिक्षित युवक भाविकांच्या सेवेसाठी कार्यरत राहणार असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे. या अभ्यासक्रमाच्या माहितीबाबत ते सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकारांशी बोलत होते.

व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था (आयटीआय) तर्फे ‘वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट’ हा विशेष अभ्यासक्रम सुरू करण्यात आला असून, या उपक्रमाला राष्ट्रीय कौशल्य पात्रता आराखडा (National Skill Qualification Framework – NSQF) यांची मान्यता मिळाली आहे. या अभ्यासक्रमाच्या निमित्ताने तीर्थक्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. धार्मिक मेळ्यांमध्ये, यात्रांमध्ये आणि तीर्थक्षेत्रांवर कार्य करणाऱ्या युवकांना या माध्यमातून व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेले युवक भाविकांचे स्वागत, मार्गदर्शन, आरोग्य व स्वच्छता जनजागृती तसेच सामाजिक समन्वय या क्षेत्रांत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील. त्याचबरोबर २०२६–२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, लाखो भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक वातावरणात शिस्तबद्ध व्यवस्थापन व सेवा पुरवण्यासाठी या अभिनव उपक्रम द्वारे कुंभमेळ्यातील भाविकांना सेवा-प्रदान करण्यासाठी अतिशय मोलाचे साहाय्य होणार असल्याची माहितीही मंत्री लोढा यांनी यावेळी दिली. 

 

विशेष म्हणजे अल्पमुदतीच्या अभ्यासक्रम कार्यक्रमांतर्गत  ‘वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट’ हा अभ्यासक्रम नाशिक जिल्ह्यात घेण्यात येणार असून कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांचे व्यवस्थापन, मार्गदर्शन आणि सेवा कार्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करणे हा यामागचा उद्देश आहे. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरातील विविध भागात अशा स्वरूपाचे अभ्यासक्रम चालवले जात असल्याची माहिती कौशल्य 

Related Articles

दुष्काळावर मात करण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई मुंबई, दि. २६ : राज्यातील अपुऱ्या पावसामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेल्या ट्रिगर-१ आणि ट्रिगर-२ लागू असलेल्या ३०४ तालुक्यांतील प्रत्येक गावात...

‘तिसऱ्या मुंबई’त १५ लाख रोजगारांचे लक्ष्य!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई रायगड-अलिबाग, दि. २५ : नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र अर्थात नैना परिसराच्या नियोजनबद्ध विकासातून १५ लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!