spot_img
spot_img

महायुतीचा दणदणीत विजय; मोदींच्या कामावर जनतेची मोहोर

रविंद्र चव्हाण यांच्या कडून मतदारांचे आभार

झुंजार सेनापती l मुंबई
पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीला मिळालेला विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या अकरा वर्षांच्या कामाचा परिणाम असल्याचे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
चव्हाण म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कष्टकरी, शेतकरी, शहरी आणि ग्रामीण अशा सर्वच घटकांसाठी सातत्याने काम केले. त्याच विश्वासामुळे जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे. आज जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. मात्र या निवडणुकीच्या मध्यंतरात आमचे नेते अजित दादा यांच्या अपघाती निधनाची दु:खद घटना घडली. हा महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का होता.”
ते पुढे म्हणाले, “निवडणुका मोठ्या असोत किंवा छोट्या, कार्यकर्त्यांच्या बळावर आणि विचारधारेच्या जोरावर विजय मिळवायचा असतो. अजित दादांच्या निधनानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सर्व कार्यकर्त्यांना मोठ्या सभा किंवा जल्लोष टाळण्याचे निर्देश दिले होते. बूथस्तरावर शांतपणे काम करत निवडणूक लढवण्याचे आवाहन करण्यात आले होते.”
गेल्या तीन वर्षांत देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दिवंगत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रभावी काम झाले असल्याचा दावा करत चव्हाण म्हणाले, “बाराही जिल्हा परिषदांमध्ये महायुती सत्तेत येईल असे चित्र आहे. राज्यातील १२५ हून अधिक पंचायत समित्यांपैकी ५० पेक्षा जास्त ठिकाणी भाजप सत्ता स्थापन करेल. एकूणच सुमारे ८० टक्क्यांहून अधिक लोकप्रतिनिधी महायुतीचे निवडून येत आहेत. सर्व मतदारांचे महायुतीच्या वतीने मी मनःपूर्वक आभार मानतो.” असं प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी म्हटले आहे.

Related Articles

अमृत’च्या माध्यमातून ईव्ही चार्जिंग स्टेशन व्यवसायाला चालना

झुंजार सेनापती l मुंबई, दि. १ : हरित ऊर्जा, स्वच्छ पर्यावरण आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत),...

Kako tiki taka casino promo code môže zmeniť váš herný zážitok

V tomto článku sa pozrieme na to, ako môže tiki-takacasino.sk promo kód zmeniť váš herný zážitok. Zameriame sa na výhody, ktoré ponúka, ako ho...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!