spot_img
spot_img

ऑर्केस्ट्रा-बारचे परवाने कायमचे रद्द करणार!

देवेंद्र फडणवीस यांचा कडक इशारा

 ■ झुंजार सेनापती l मुंबई
राज्यात वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ऑर्केस्ट्रा-बारवर कठोर कारवाई करण्यासाठी कायद्यात लवकरच दुरुस्ती करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. तीन वेळा नियमभंग आढळल्यास संबंधित बारचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची तरतूद करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार सुभाष देशमुख यांनी प्रश्नोत्तराच्या तासात राज्यातील ऑर्केस्ट्रा व डान्सबारमधील नियमभंगाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ऑर्केस्ट्रा-बारच्या नावाखाली काही ठिकाणी डान्सबार सुरू ठेवले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. कारवाई केल्यानंतरही काही ठिकाणी पुन्हा त्याच प्रकारे व्यवसाय सुरू केला जातो. त्यामुळे कठोर कायदेशीर तरतूद आवश्यक ठरते. यासंदर्भातील दुरुस्ती चालू अधिवेशनात किंवा पुढील अधिवेशनात मांडण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
या विषयावर सर्वोच्च न्यायालय यांनी वेळोवेळी दिलेल्या निर्णयांचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले की, राज्य सरकारने यापूर्वी केलेल्या काही तरतुदी घटनाबाह्य ठरविण्यात आल्या होत्या. त्यानंतर नव्याने नियमावली तयार करण्यात आली असून ऑर्केस्ट्रा-बारसाठी विशिष्ट जागा, पार्टीशनची अट, मद्यविक्रीवरील निर्बंध आदी अटी लागू करण्यात आल्या आहेत.
पनवेल येथील प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सभागृहाला सांगितले. या चर्चेत आमदार भास्कर जाधव यांनीही सहभाग घेतला.

Related Articles

Tutto quello che devi sapere sul bonus Newgioco per i nuovi giocatori

In questo articolo, esploreremo nel dettaglio il bonus newgioco offerto ai nuovi giocatori. Discuteremo delle diverse tipologie di bonus disponibili, dei requisiti di scommessa,...

Kā x3000 lv piedāvājumi var uzlabot jūsu azartspēļu pieredzi

Šajā rakstā mēs aplūkosim, kā x3000 lv piedāvājumi var būtiski uzlabot jūsu azartspēļu pieredzi. Mēs izpētīsim dažādas bonusu iespējas, bezriska griezienus, un citas priekšrocības,...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!