spot_img
spot_img

टोलचा पुन्हा झटका! १ एप्रिलपासून वार्षिक पास महाग

झुंजार सेनापती l मुंबई
राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना आता वार्षिक टोल पाससाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. १ एप्रिलपासून वार्षिक टोल पासच्या शुल्कात वाढ करण्यात आली असून ३ हजार रुपयांऐवजी आता ३ हजार ७५ रुपये भरावे लागणार आहेत.
नवा दर आर्थिक वर्ष २०२६–२७ साठी लागू करण्यात येणार आहे. नव्या नियमांनुसार ३ हजार ७५ रुपये भरून वाहनधारकांना वार्षिक टोल पास मिळणार असून या पासद्वारे एक वर्षात जास्तीत जास्त २०० वेळा टोल नाक्यांवरून प्रवास करता येणार आहे.
मात्र या सुविधेत एक वर्ष किंवा २०० वेळा टोल पार करणे यापैकी जे आधी होईल ते लागू राहणार आहे. जर एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच २०० वेळा टोल पार केले तर त्या पासची वैधता तत्काळ संपुष्टात येणार आहे.

Related Articles

अमानुषतेचा कळस!अल्पवयीन विवाहितेवरअत्याचार करून गावच्या चावडीत बांधले

झुंजार सेनापती l बीड  बीड जिल्ह्यात मानवतेला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. बीड तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात अल्पवयीन विवाहित...

एल पी जी ऐवजी पी एन जी कडे वळा; केंद्राचे नागरिकांना आवाहन

झुंजार सेनापती l मुंबई  आखाती भागात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्याबाबत देशात चिंता व्यक्त केली जात असली तरी स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या पाईपद्वारे मिळणाऱ्या नैसर्गिक...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!