spot_img
spot_img

मच्छीमारांना स्वावलंबी बनविण्यासाठी शासन प्रयत्नशील

- मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

झुंजार सेनापती l मुंबई
राज्यातील मच्छीमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून स्वावलंबी बनविण्यासाठी शासन विविध योजनांच्या माध्यमातून प्रभावीपणे प्रयत्न करत असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली.
मंत्रालयात आयोजित बैठकीत विविध मच्छीमार संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना ते बोलत होते. या बैठकीत मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव रामास्वामी एन, महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले, राष्ट्रीय मत्स्य विकास मंडळाचे सदस्य प्रकाश एम. लोणारे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री राणे म्हणाले, पारंपरिक मासेमारीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून उत्पादनक्षमतेत वाढ करणे हा शासनाचा मुख्य उद्देश आहे. यासाठी अत्याधुनिक बोटी, जाळी तसेच कोल्ड स्टोरेज सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. याशिवाय प्रशिक्षण, कर्ज सुविधा आणि अनुदान योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे केली जात आहे.
किनारपट्टी भागातील पायाभूत सुविधांचा विकास, बंदरांचे आधुनिकीकरण आणि मत्स्य प्रक्रियेसाठी उद्योग उभारणी यावरही शासन विशेष लक्ष केंद्रित करत आहे. मच्छीमारांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांचे जीवनमान उंचावणे हे सरकारचे प्रमुख ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच युवकांनी गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायाकडे वळावे, यासाठी विविध प्रोत्साहनपर योजना राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांमुळे राज्यातील मच्छीमार समुदाय अधिक सक्षम होईल आणि मत्स्य व्यवसायाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास मंत्री राणे यांनी व्यक्त केला.

Related Articles

जनादेश, विचारधारा आणि सत्तेची भूक

⬤ झुंजार सेनापती l प्रतिनिधी  महाराष्ट्राच्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी स्पष्टपणे भाजप-शिवसेना युतीला बहुमताचा कौल दिला होता. निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांनी एकत्र लढत जनतेकडे मतांची...

बेस्ट वाचवण्यासाठी कामगारांचा एल्गार; शुक्रवारपासून बेमुदत संपाचा इशारा

⬤ झुंजार सेनापती l मुंबई मुंबईकरांची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या बेस्ट उपक्रमाच्या कथित खासगीकरणाविरोधात आणि अदानी समूहाला लाभ मिळवून देण्याच्या प्रयत्नांविरोधात बेस्ट कामगारांनी संघर्षाची भूमिका घेतली...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!