spot_img
spot_img

पिंपरीत बालअपहरणाच्या तयारीत असलेली महिला पकडली

“गुंगी स्प्रे, चाकूसह घेतले ताब्यात

झुंजार सेनापती l पुणे 

पिंपरी-चिंचवड शहरातील काळभोर नगर परिसरात आज दुपारी एक खळबळजनक घटना उघडकीस आली. लहान बाळ चोरण्याच्या तयारीत असलेल्या एका संशयित महिलेला सतर्क नागरिकांनी रंगेहात पकडले. संतप्त जमावाने तिला चोप देत अखेर पिंपरी पोलिसांच्या ताब्यात दिले.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला बराच वेळ परिसरात संशयास्पद हालचाली करत होती. तिने एका लहान मुलाला जवळ बोलावून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलाने आरडाओरडा केल्याने नागरिकांचे लक्ष वेधले गेले आणि तात्काळ हस्तक्षेप करत महिलेला पकडण्यात आले.
नागरिकांनी तिची झडती घेतली असता बॅगमध्ये चाकू, मुंगी मारण्याचे औषध आणि गुंगी आणणारा स्प्रे आढळून आला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पालकांमध्ये मोठी चिंता व्यक्त होत आहे.
दरम्यान, पिंपरी पोलिसांनी संशयित महिलेला ताब्यात घेतले असून तिची सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणामागे एखादी मोठी टोळी कार्यरत आहे का, याचाही तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. नागरिकांनीही सतर्क राहून अशा संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Hoe je slimmer kunt spelen en winnen bij Vegas Hero Casino online

In dit artikel bespreken we praktische strategieën en tips om slimmer te spelen en je kansen op winst te vergroten bij het Vegas Hero...

मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजना अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा!

झुंजार सेनापती l मुंबई मत्स्यव्यवसाय विभागाचा निधी प्रभावीपणे खर्च होण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावे. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेवर विशेष भर देऊन लाभार्थ्यांची संख्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!