spot_img
spot_img

बेकायदा खडी क्रेशर परवानग्यांचे प्रकरण कलेक्टर पाठकांच्या अंगलट येणार ?

झुंजार सेनापती l मुंबई
तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना एसआयटीने अटक केल्यानंतर आता त्यांच्या कार्यकाळातील विविध निर्णयांची चौकशी अधिक वेगाने सुरू झाली आहे. सध्या पाठक पोलीस कोठडीत असून, त्यांच्या कार्यकाळात खडी क्रेशरला दिलेल्या परवानग्यांवरूनही नवे प्रश्न उपस्थित होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अनेक खडी क्रेशर प्रकल्पांना आवश्यक विभागीय नाहरकत प्रमाणपत्रे आणि पर्यावरण विभागाची मंजुरी न घेता परवानग्या देण्यात आल्याचा आरोप होत आहे. नियमानुसार खडी क्रेशर सुरू करण्यासाठी विविध विभागांची परवानगी घेऊन प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजूर करणे आवश्यक असते. मात्र, अनेक प्रकरणांमध्ये ही प्रक्रिया डावलण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
या संपूर्ण प्रकरणी उच्च न्यायालयात याचिकाही दाखल असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे खडी क्रेशरना दिलेल्या परवानग्यांची चौकशी अधिक खोलात जाण्याची शक्यता व्यक्त होत असून, हे प्रकरणही अविनाश पाठक यांच्या अडचणीत भर टाकणार असल्याची शक्यता आहे.

Related Articles

Hoe je slimmer kunt spelen en winnen bij Vegas Hero Casino online

In dit artikel bespreken we praktische strategieën en tips om slimmer te spelen en je kansen op winst te vergroten bij het Vegas Hero...

मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजना अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा!

झुंजार सेनापती l मुंबई मत्स्यव्यवसाय विभागाचा निधी प्रभावीपणे खर्च होण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावे. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेवर विशेष भर देऊन लाभार्थ्यांची संख्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!