spot_img
spot_img

मंत्री जयकुमार गोरे बिनशर्त माफी मागा!

खा.प्रणिती शिंदेंची कायदेशीर नोटीस

झुंजार सेनापती l मुंबई
सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. कथित बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप करत सात दिवसांच्या आत बिनशर्त माफी मागण्याची मागणी या नोटीसमध्ये करण्यात आली आहे.
९ मे रोजी सोलापूर येथे झालेल्या एका कार्यक्रमात जयकुमार गोरे यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर टीका केली होती. “त्या सोलापूरमधील रस्त्यांचा विचार करत नाहीत, तर दिल्लीतील राहुल गांधी यांच्या घरासमोरील रस्त्यांचा विचार करतात,” असे विधान त्यांनी केले होते. या वक्तव्यामुळे सामाजिक प्रतिष्ठेला धक्का बसल्याचा दावा शिंदे यांच्या वतीने करण्यात आला आहे.
या प्रकरणी खासदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने अॅड. असीम सरोदे, अॅड. श्रिया आवले आणि अॅड. आर्या राजेभोसले यांनी नोटीस पाठवली आहे. मोहोळ–वळसंग रस्त्याच्या कामाच्या श्रेयवादावरून सुरू असलेल्या वादातून ही टिप्पणी करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
नोटीसमध्ये जयकुमार गोरे यांनी यापूर्वी केलेल्या काही विधानांचाही उल्लेख करण्यात आला असून, नोटीस मिळाल्यानंतर सात दिवसांत माफी न मागितल्यास न्यायालयीन कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Related Articles

विठुरायाच्या दर्शनासाठी जागतिक दर्जाच्या सुविधा

⬤ झुंजार सेनापती l मुंबई आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी 'पंढरपूर कॉरिडॉर' प्रकल्पाची...

विठुरायाच्या दर्शनासाठी आधुनिक सुविधा; पंढरपूर कॉरिडॉर उभारणार

⬤ झुंजार सेनापती l पंढरपूर आषाढी शुद्ध एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक मानाचे वारकरी बाबासाहेब माधव माने व प्रभावती...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!