spot_img
spot_img

मच्छीमारांच्या प्रश्नांवर मंत्रालयात चर्चा!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई
मत्स्य व्यवसाय विभागातील विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्रालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत मच्छीमारांचे प्रश्न, विभागातील प्रशासकीय बाबी आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या मदत पॅकेजच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीत महाराष्ट्र सागरी व भूजलाशयीन मच्छीमार कल्याणकारी महामंडळाची स्थापना, विभागाच्या आकृतीबंधाची अंमलबजावणी, मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयातील गट-क संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या २०२६ मधील बदल्या आणि सप्टेंबर २०२५ मध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मत्स्य व्यवसाय क्षेत्राचे झालेल्या नुकसानीसाठी जाहीर केलेल्या विशेष मदत पॅकेजच्या अंमलबजावणीवर चर्चा करण्यात आली.
तसेच, मत्स्य व्यावसायिकांना प्रलंबित असलेल्या डिझेल परताव्याच्या प्रश्नाचाही आढावा घेण्यात आला. या विषयांवर संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करून सर्व प्रलंबित बाबी कालबद्ध पद्धतीने मार्गी लावाव्यात, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.
मच्छीमार कल्याणकारी महामंडळाची स्थापना, नुकसानग्रस्तांना मदतीचे वितरण आणि डिझेल परताव्याचा प्रश्न मार्गी लागल्यास राज्यातील सागरी तसेच भूजलाशयीन मत्स्य व्यवसायाशी संबंधित घटकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. आता संबंधित विभागाकडून या निर्देशांची कितपत आणि किती वेगाने अंमलबजावणी होते, याकडे मच्छीमार व मत्स्य व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

दोन गुजराती महाराष्ट्र चालवणार ? सह्याद्रीच्या विनाशावरून राज ठाकरे संतप्त!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई टोरंट हायड्रो पॉवर प्रकल्पासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कर्जत येथील सभेत राज्य सरकारवर...

ओबीसी विद्यार्थ्यांसाठी ५०० क्षमतेची वसतिगृहे; १५ जिल्ह्यांत एक रुपयात जागा!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई महात्मा फुले यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या कार्याचा वारसा जपणे आवश्यक आहे. महात्मा फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त पुण्यातील फुलेवाडा आणि...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!