spot_img
spot_img

डेन्मार्कच्या मंत्र्यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपालांची भेट

ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि शिक्षण क्षेत्रातील सहकार्यावर चर्चा

 ⬤ झुंजार सेनापती l मुंबई

डेन्मार्कचे व्यवसाय आणि स्पर्धात्मकता मंत्री मार्टिन लिडेगार्ड यांनी शिष्टमंडळासह महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन येथे सदिच्छा भेट घेतली.

डेन्मार्कमधील लॉजिस्टिक्स क्षेत्रातील आघाडीची कंपनी मर्स्कसह डेन्मार्कच्या ६३ कंपन्या महाराष्ट्रात कार्यरत असल्याची माहिती मंत्री मार्टिन लिडेगार्ड यांनी राज्यपालांना दिली. भारत आणि युरोपीय महासंघ यांच्यात होणाऱ्या मुक्त व्यापार कराराचा महाराष्ट्राला मोठा लाभ होईल, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

भारत आणि डेन्मार्क यांच्यात हरित धोरणात्मक भागीदारी असून त्यामध्ये पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, हरित हायड्रोजन आणि जीवन विज्ञान या क्षेत्रांचा समावेश आहे. युरोपीय महासंघ हा जगातील सर्वात मोठा ऊर्जा आयातदार असल्याचे नमूद करून भारत आणि डेन्मार्क यांच्यात ऊर्जा क्षेत्रात सहकार्याच्या मोठ्या संधी असून शिक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमध्येही सहकार्य वाढविण्याबाबत त्यांनी विशेष स्वारस्य व्यक्त केले.

 डेन्मार्क हा आकाराने लहान मात्र समृद्ध देश असल्याचे सांगताना तेथील श्रीमंत आणि गरीब यांच्यातील आर्थिक दरी तुलनेने कमी असल्याचे त्यांनी नमूद केले. डेन्मार्कच्या अर्थव्यवस्थेत भारतीय वंशाच्या नागरिकांचे योगदानही महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.

डेन्मार्कच्या शिष्टमंडळाचे महाराष्ट्रात स्वागत करताना राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी भारताने शिक्षण, कौशल्य विकास, डिजिटल व्यवहार आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांत केलेल्या प्रगतीची माहिती दिली.

यावेळी डेन्मार्कचे भारतातील राजदूत रासमुस अबिल्डगार्ड क्रिस्टेन्सन; आंतरराष्ट्रीय व्यवसाय विभागाच्या उपस्थायी सचिव टिने नील्सन हर्ट्झ; उपमिशन प्रमुख मार्टिन एग्नुड पीटर्सन; मंत्र्यांचे विशेष सल्लागार ख्रिस्तोफर लेहमन; समुपदेशक जोसेफिन इव्हा लिली पॅलेसन; प्रथम सचिव मॅथियास एमिल बेंटसन; मंत्र्यांच्या खासगी सचिव अमाली रोझेनबेक क्रिस्टियनसेन; तसेच विभागप्रमुख विनोथा थियागराज आणि स्टेफन ल्यूक पीटर्सन उपस्थित होते.

Related Articles

महाराष्ट्राला जागतिक शिक्षण- संशोधनाचे केंद्र बनविणार!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई उच्च शिक्षणाचा  उद्देश केवळ पदवी देणे नसून, विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करणे, त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास सक्षम...

फळबागा जगविण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठविणार!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई राज्यात फळबागा असलेल्या एकूण ६ लाख ८५ हजार हेक्टर क्षेत्रापैकी मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात सुमारे २.५ लाख हेक्टर क्षेत्र आहे....

ताज्या बातम्या

error: Content is protected !!