⬤ झुंजार सेनापती l बीड
नेकनूर येथील महादेव मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविण्यात यावेत, अशी गावातील हिंदू समाज बांधवांची मागणी होती. या मागणीची दखल घेत उपसरपंच सचिन भैय्या शिंदे व शिंदे परिवाराने दिवाळीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत स्वखर्चातून ५० हजार रुपयांचे पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम आज सुरू केले.
महादेव मंदिर परिसर स्वच्छ, सुंदर आणि सुस्थितीत असावा, या उद्देशाने शिंदे परिवाराने पुढाकार घेतला आहे. कोणत्याही शासकीय निधीची प्रतीक्षा न करता स्वतःच्या खर्चातून हा उपक्रम हाती घेतल्याने ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे.
सण-उत्सवाच्या काळात केवळ शुभेच्छा न देता गावाच्या विकासासाठी प्रत्यक्ष योगदान देण्याचा शिंदे परिवाराचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरत आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.


