spot_img

उजनी धरण परिसरात आधुनिक मत्स्य बाजारपेठ उभारणार!

मत्स्यसंपदा योजनेंतर्गत प्रस्ताव सादर करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई
उजनी धरण परिसरातील मच्छीमार बांधवांना मत्स्य उत्पादनासाठी आधुनिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तीन ठिकाणी आधुनिक मत्स्य बाजारपेठ उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. यामध्ये उजनी धरणाजवळील प्रेमनगर, पंढरपूर आणि पंढरपूर-माळशिरस सीमेवरील बंधाऱ्यालगत या तीन ठिकाणांचा समावेश आहे. या बाजारपेठांच्या उभारणीसाठी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत महिनाभरात सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिले.
या प्रस्तावांच्या तयारीसाठी मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी, गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांनी समन्वयाने काम करावे. स्थानिक आमदारांसमवेत प्रस्तावांचा आढावा घेऊन त्यांच्या मान्यतेनंतर हे प्रस्ताव शासनाकडे सादर करावेत, असेही मंत्री राणे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, उजनी धरणातील गोड्या पाण्यात चांगल्या प्रकारे वाढू शकणाऱ्या नव्या मत्स्यप्रजातींचे संवर्धन आणि उत्पादन वाढविण्यासाठी स्वतंत्र संकल्पना तयार करण्याची मागणी आमदारांनी बैठकीत केली. तसेच मच्छीमारांनी उत्पादित केलेल्या मासळीला योग्य बाजारपेठ मिळावी, यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यावरही भर देण्यात आला.
सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणावर मासेमारी करणाऱ्या मच्छीमार बांधवांसाठी आधुनिक मासळी बाजारपेठ उभारण्याच्या अनुषंगाने मंत्रालयात आयोजित बैठकीत हे निर्देश देण्यात आले. या बैठकीस आमदार अभिजित पाटील, मत्स्यव्यवसाय आयुक्त भानुदास पालवे, सोलापूरचे जिल्हाधिकारी (दूरदृश्य प्रणालीद्वारे) तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

दान पत्रासाठी आता पाचशे रुपये मुद्रांक शुल्क, अपील शुल्क हजार रुपये

⬤ झुंजार सेनापती l मुंबई महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील विविध प्रकारच्या नोंदणीसाठी आकारण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्कात एकरुपता व सुसंगती आणण्याकरिता महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम ३२ (ब)...

जलयुक्त शिवार ३.० मधून १८ हजार गावे जलसमृद्ध करणार!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करून ग्रामीण भाग जलसमृद्ध करण्यासाठी जलयुक्त शिवार ३.० अभियानाच्या माध्यमातून राज्यातील १८ हजार गावांना जलसमृद्ध...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!