spot_img

झाडांची कत्तल, पोलिसांचे मौन! पवनचक्की कंपनीला अभय कोणाचे?

⬤ झुंजार सेनापती l नेकनूर

विकासाच्या नावाखाली निसर्गाची कत्तल सुरू असताना त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणांकडूनच दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नेकनूर परिसरातील नागरिकांनी केला आहे. गारपीर माथा ते चाकरवाडी रस्त्यावर खासगी पवनचक्की कंपनीच्या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वृक्षतोड करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यासंदर्भात नेकनूर पोलीस ठाण्यात दोन वेळा लेखी निवेदन देऊन १५ दिवस उलटले, तरीही अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पवनचक्की कंपनीच्या कंत्राटदारांकडून प्रकल्पाच्या कामासाठी गारपीर माथा ते चाकरवाडी रस्त्याच्या कडेला असलेली अनेक झाडे तोडण्यात आली आहेत. ही वृक्षतोड सक्षम शासकीय प्राधिकरणाची आवश्यक परवानगी न घेता करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियमातील तरतुदींनुसार आवश्यक परवानगीशिवाय वृक्षतोड करता येत नसताना संबंधितांकडून नियमांचे उल्लंघन झाल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी नागरिकांनी नेकनूर पोलीस ठाण्यात दोन वेळा लेखी निवेदने सादर केली आहेत. मात्र, पंधरा दिवसांचा कालावधी उलटूनही गुन्हा दाखल झालेला नाही किंवा चौकशी सुरू झाल्याची माहिती मिळालेली नाही, असा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
खासगी कंपनीच्या प्रकल्पासाठी पर्यावरणाचे नुकसान होत असल्याची तक्रार करूनही पोलीस प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित पवनचक्की कंपनीचे अधिकारी, कंत्राटदार आणि वृक्षतोडीत सहभागी असलेल्या व्यक्तींची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच वृक्षतोडीसंदर्भातील शासकीय परवानग्यांची पडताळणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
आंदोलनाचा इशारा!
नेकनूर पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन वस्तुनिष्ठ चौकशी करावी आणि दोषींवर कायद्यानुसार कारवाई करावी. अन्यथा नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Related Articles

जलयुक्त शिवार ३.० मधून १८ हजार गावे जलसमृद्ध करणार!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करून ग्रामीण भाग जलसमृद्ध करण्यासाठी जलयुक्त शिवार ३.० अभियानाच्या माध्यमातून राज्यातील १८ हजार गावांना जलसमृद्ध...

एमएसएमई उद्योजकांसाठी शासकीय योजनांची माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध होणार!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई माहिती हे सक्षमीकरणाचे प्रभावी साधन असून, केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. सूक्ष्म, लघु...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!