spot_img

रोजगार हमी योजनेतील मजुरांच्या खात्यात 2 हजार 856 कोटी रुपये जमा

झुंजार सेनापती l मुंबई

राज्यातील रोजगार हमी योजनेतील मजुरांच्या बँक खात्यामध्ये सन 2024- 25 मध्ये 2 हजार 856.30 कोटी रुपयांचा निधी जमा करण्यात आल्याची माहिती रोजगार हमी योजना विभागाकडून देण्यात आली आहे.

          या योजनेंतर्गत 100 दिवसांपर्यंतची मजुरी केंद्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निधीमधून दिली जाते. तर 100 दिवसांच्या वरील मजुरी राज्या शासनाच्या निधीतून दिली जाते. त्यानुसार सन 2024-25 मध्ये 100 दिवसांपर्यंत मजुरीचे 2 हजार 616.30 कोटी निधी आणि 100 दिवसांवरील मजुरीचे 240 कोटी रुपये असा एकूण 2 हजार 856.30 कोटी निधी मजुरांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात आला आहे.

केंद्र व राज्य शासनाकडून सन 2024-25 मध्ये अनुक्रमे 66.21 कोटी व 5.88 कोटी रुपये असा एकूण 72.09 कोटी इतका निधी मजुरीपोटी पालघर जिल्ह्यातील मजुरांच्या खात्यात जमा करण्यात आला असल्याची महितीही ‘रोहयो’ विभागाने दिली आहे.

Related Articles

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर दगडफेक!

⬤ झुंजार सेनापती l छत्रपती संभाजीनगर  महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या गोलवाडी परिसरातील निवासस्थानालाच मध्यरात्री लक्ष्य करण्यात आल्याने शहराच्या...

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांची पंचदीप बालग्रामला सदिच्छा भेट!

⬤ झुंजार सेनापती l पनवेल : महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर आणि त्यांचे पती, नवी मुंबईचे सहपोलीस आयुक्त दीपक साकोरे यांनी पनवेल येथील...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!