झुंजार सेनापती l प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांच्यासमवेत आज महाड जिल्हा रायगड येथील दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर न्यायालय नूतन इमारतीचे कोनशिला अनावरण आणि भूमिपूजन केले.
यावेळी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक अराधे, उच्च न्यायालय न्यायाधीश मकरंद कर्णिक, न्यायाधीश मिलिंद साठ्ये, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री आदिती तटकरे, मंत्री भरत गोगावले आणि इतर मान्यवर उपस्थित होते.