spot_img
spot_img

जीएसटी अधिकारी मृत्यू प्रकरण; मुख्य आरोपी प्रदीप फाटे पुण्यातून अटकेत

झुंजार सेनापती l मुंबई
बीड जिल्ह्यातील वस्तू व सेवा कर विभागाचे अधिकारी सचिन नारायण जाधवर यांच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांना महत्त्वाचे यश मिळाले आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आणि वरिष्ठ अधिकारी प्रदीप फाटे याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. सुमारे दीड महिन्यांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या फाटे याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाघोली परिसरातून जेरबंद केले.
१६ जानेवारी २०२६ रोजी सचिन जाधवर हे कर्तव्यावर जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडले होते. मात्र ते घरी परतले नाहीत. १७ जानेवारी रोजी मांजरसुंबा घाटातील कपिलधारवाडी फाट्याजवळ त्यांच्या कारमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्हा हादरला होता.
या प्रकरणानंतर सचिन जाधवर यांच्या पत्नी मयुरी जाधवर यांनी वरिष्ठ अधिकारी प्रदीप फाटे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अतिरिक्त पदाचा गैरवापर करून मानसिक छळ करणे, कार्यालयात वारंवार अपमान करणे तसेच काही विशिष्ट कंपन्यांची बेकायदेशीर कामे करण्यासाठी दबाव टाकणे, असे आरोप त्यांनी केले होते.
२५ फेब्रुवारी रोजी जाधव कुटुंबीयांनी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण केले होते. या प्रकरणाला प्रसारमाध्यमांनीही मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी दिल्याने पोलिसांवर कारवाईचा दबाव वाढला होता.
पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक तयार करण्यात आले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे फाटे पुण्यात लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने वाघोली येथे छापा टाकून त्याला अटक केली. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस निरीक्षक बंटेवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे, अशोक दुबाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पार पाडली.
प्रदीप फाटेच्या अटकेमुळे या प्रकरणातील आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, जाधव कुटुंबीयांना न्याय मिळेल का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Tutto quello che devi sapere sul bonus Newgioco per i nuovi giocatori

In questo articolo, esploreremo nel dettaglio il bonus newgioco offerto ai nuovi giocatori. Discuteremo delle diverse tipologie di bonus disponibili, dei requisiti di scommessa,...

Kā x3000 lv piedāvājumi var uzlabot jūsu azartspēļu pieredzi

Šajā rakstā mēs aplūkosim, kā x3000 lv piedāvājumi var būtiski uzlabot jūsu azartspēļu pieredzi. Mēs izpētīsim dažādas bonusu iespējas, bezriska griezienus, un citas priekšrocības,...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!