झुंजार सेनापती l मुंबई
महाराष्ट्र सरकारने 12 मे 2023 चा मत्स्यव्यवसाय विभागाचा गोरगरीब मच्छिमाराकरिता काळा निर्णय ठरलेला शासन निर्णयावरिल बंदी उठवली म्हणून राज्यातील मच्छिरांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. तो त्वरित मागे घ्यावा म्हणून महाराष्ट्रातील मच्छिमार बांधव उद्या बुधवार दिनांक 19/03/2025 रोजी आझाद मैदानात एकवटणार आहेत.
हा काळा जी.आर.रद्द करण्यात यावा म्हणून वेगवेगळया मार्गाने महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघर्ष कृती समितीच्या नेतृत्वाखाली,मत्स्यव्यवसाय आयुक्त, सचिव, मंत्री, आमदार.यांना भेटून निवेदन व चर्चा घडवून आणल्या आहेत मात्र गेंड्याची कातडी असलेल्या सरकार मधिल मंत्र्याला काही ही फरक पडलेला नाही अथवा कोणी राजकीय पदाधिकारी आमदार अथवा खासदार या साठी पुढे येऊन न्याय देऊ शकला नाही
सरकारचे लक्ष वेधूनघेण्यासाठी एक दिवस राज्यभर मासेमारी व विक्री बंद ठेऊन आंदोलन करून ही व त्याला पूर्ण महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद मिळाला असतानाही त्याची दखल शासनाकडून घेतली गेली नाही .म्हणून महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघर्ष कृती समिती पदधिकार्यांनी त्या शासन निर्णयाविरुद्ध आझाद मैदान मुंबई येथे मच्छिमारांचे आंदोलन करण्याचे ठरवले आहे.
उद्या दिनांक 19/03/2025 रोजी महाराष्ट्रभरातून समस्त मछिमार बंधू भगिनींनी मुंबई येथे आझाद मैदानात होणाऱ्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जेष्ठ नेते शफिकभाई शेख यांनी केले आहे.