spot_img
spot_img
spot_img

शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार!

चंद्रशेखर बावनकुळे

झुंजार सेनापती l मुंबई

राज्य सरकारच्या वतीने भूसंपादन प्रक्रियेत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ एल.बोरगाव ते मुक्ताईनगर रस्त्याचे चौपदरीकरणासाठी भूसंपादनाला योग्य दर मिळावा यासाठी २ एप्रिल रोजी बैठक आयोजित करण्यात येणार आहे. या बैठकीत सविस्तर चर्चा करून शेतकरी हिताच्या दृष्टीने मार्ग काढला जाईलअसे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत सांगितले.

सदस्य एकनाथ खडसे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. सदस्य डॉ. परिणय फुकेसदाभाऊ खोतयोगेश टिळेकरश्रीमती भावना गवळी आदींनी या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.

मंत्री श्री. बावनकुळे म्हणालेया मार्गातील पहिल्या टप्प्यातील भूसंपादन २०२२ मध्ये पूर्ण झाले असूनदुसऱ्या टप्प्याचे भूसंपादन २०२३ मध्ये झाले आहे. यामध्ये दरांमध्ये झालेल्या फरकावरही चर्चा करण्यात येईल.

ही भूसंपादन प्रक्रिया भूसंपादन कायदा २०१३ आणि राष्ट्रीय महामार्ग अधिनियम १९५६ यानुसार केली जात आहे. भूसंपादन करताना शेतकऱ्यांच्या हिताचा विचार महत्त्वाचा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. सध्या राष्ट्रीय महामार्गरेल्वे अशा विविध प्रकल्पांसाठी भूसंपादन करताना विविध कायदेनियम यांनुसार दर दिला जातो. त्यामुळे भूसंपादन करताना राज्य सरकारच्या भूसंपादन कायद्याचा अवलंब केल

Related Articles

मथुरेच्या खासदार हेमा मालिनींचे मुंबईत मतदान

झुंजार सेनापती l मुंबई उत्तर प्रदेशातील मथुरा लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आणि ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावला. २०१४ पासून...

लोकशाहीची थट्टा! मतदानात पैसे, बोगस मतं आणि EVMचा गोंधळ

झुंजार सेनापती l मुंबई महापालिका निवडणुकीच्या मतदानदिवशी शहरात अभूतपूर्व गोंधळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. अनेक मतदान केंद्रांवर ईव्हीएम अचानक बंद पडल्याने मतदारांची मोठी रखडपट्टी झाली....

ताज्या बातम्या

error: Content is protected !!