spot_img
spot_img

जागेवरच’एचएसआरपी’बसवून मिळणार

झुंजार सेनापती l मुंबई l प्रतिनिधी

उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) उत्पादक निवासस्थानी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी वाहनावर पाटी बसवण्याची सेवा देऊ शकतात. निवासी कल्याण संघटनासोसायटी येथे शिबिर आयोजित करू शकतात. एका ठिकाणी किमान २५ किंवा त्यापेक्षा जास्त वाहन मालकांनी निवासस्थानीव्यवसायाच्या ठिकाणी किंवा निवासी कल्याण संघटनासोसायटीमध्ये वाहनांवर एचएसआरपी बसविण्याची एकत्रित बुकिंग केल्यास कोणतेही अतिरिक्त फिटमेंट शुल्क न आकारता उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्यात येणार आहे.

राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वीची नोंदणी केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्यात येत आहे. अशा जुन्या वाहनांना ही पाटी बसविण्याकरिता तीन उत्पादकांची परिवहन विभाग मार्फत निवड केली आहे. वाहन मालकांनी वाहनांवर ही पाटी बसविण्यासाठी परिवहन विभागाच्या https://transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्याकरिता शुल्काचा भरणा ऑनलाईन पद्धतीने करावा. ही पाटी बसविण्याकरता वाहन मालकांनी वैयक्तिकरित्या होम फिटमेंट सर्विस या पर्यायाचा वापर केल्यास त्यांना अतिरिक्त शुल्काचा भरणा करावा लागणार आहे.

उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी संचासह बसविण्याचे जीएसटी वगळून शुल्क

दुचाकी वाहने व ट्रॅक्टर ४५० रुपयेतीन चाकी वाहने ५०० रुपयेहलकी वाहनेप्रवासी कारमध्यम व जड वाहने ७४५ रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे.

Related Articles

Hoe je slimmer kunt spelen en winnen bij Vegas Hero Casino online

In dit artikel bespreken we praktische strategieën en tips om slimmer te spelen en je kansen op winst te vergroten bij het Vegas Hero...

मत्स्यव्यवसाय विभागाच्या योजना अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा!

झुंजार सेनापती l मुंबई मत्स्यव्यवसाय विभागाचा निधी प्रभावीपणे खर्च होण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण योजनांच्या माध्यमातून अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावे. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेवर विशेष भर देऊन लाभार्थ्यांची संख्या...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!