spot_img
22.8 C
New York
Thursday, July 10, 2025

Buy now

spot_img

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना जागतिक व्यासपीठावर नेण्याचा संकल्प

-सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार

झुंजार सेनापती l मुंबई

संविधान अमृत महोत्सव व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त सादर करण्यात आलेला ‘जागर संविधानाचा  गौरव विश्वरत्न डॉ. बाबासाहेबांचा’ हा सांगीतिक कार्यक्रम केवळ सांस्कृतिक कार्यक्रम न राहता, सामाजिक जाणीव जागवणारा हा सोहळा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून दिलेली मूल्ये, तत्वे आणि त्यांचे विचार जगाला मार्गदर्शक असून त्यांची ही मूल्ये व विचार जगाच्या व्यासपीठावर नेण्यात येणार असून अमेरिका आणि युरोपमधील विद्यापीठात सुध्दा चर्चासत्र, शोधनिबंध सादर करण्यात येतील, असा सांस्कृतिक कार्य विभागाचा मानस असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी केले.महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास  विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, आमदार संजय उपाध्याय, मुख्य सचिव सुजाता सौनिक, माजी मंत्री विजय उर्फ भाई गिरकर, राज पुरोहित, मुख्यमंत्री कार्यालयाचे व सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक विभीषण चवरे यांच्यासह सिने, नाट्य व संगीत क्षेत्रातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.मंत्री श्री. शेलार म्हणाले, संविधानाला 75 वर्षे पूर्ण होत असताना सांस्कृतिक विभागातर्फे हा कार्यक्रम आयोजित  करून  संविधानाचा जागर करण्यात येत आहे. राज्यात या निमित्ताने चर्चासत्रे, उद्देशिकेचे वाचन, घरोघरी संविधान यासारख्या उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. याचबरोबर बाबासाहेबांचे विचार आणि भारतीय संविधान जागतिक विद्यापीठांमध्ये अभ्यासासाठी मांडण्याचा सांस्कृतिक विभागाचा संकल्प आहे.

अरबी सागराच्या साक्षीने आणि गेट वे ऑफ इंडिया या ऐतिहासिक स्थळी हजारोंच्या उपस्थितीत  ‘जागर संविधानाचा’  हा कार्यक्रम होत आहे. नाट्य, संगीत आणि नृत्य यांचा सुरेख संगम हे  या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असल्याचे मंत्री श्री. शेलार म्हणाले.

मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी व अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी  मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेते सुबोध भावे यांनी केले.

Related Articles

राज्यात रिक्त पदांसाठी लवकरच ‘मेगा भरती’

झुंजार सेनापती l सोमनाथ पाटील  राज्य शासनाने सर्व विभागांना १५० दिवसांचा उद्दिष्टांचा कार्यक्रम दिला आहे. या कार्यक्रमांतर्गत आकृतीबंध, नियुक्ती नियम (रिक्रुटमेंट रूल) सुधारित करणे, अनुकंपा तत्वावरील...

फळपिक विमा योजनेचे अर्ज करण्यासाठी चार दिवसांची मुदतवाढ

झुंजार सेनापती l मुंबई हवामान आधारित फळपिक विमा योजनेच्या मर्यादित कालावधीत केंद्र सरकारने मुदतवाढ करून राज्यातील फळपिक शेतकऱ्यांना दिलासा दिल्याची माहिती कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!