झुंजार सेनापती l पुणे
संविधान विचार मंच च्या वतीने दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा भीमपुत्र आयडॉल-२०२५ हा पुरस्कार डॉक्टर मुरहरी सोपानरावजी केळे यांना सन्मान पुर्वक प्रधान करण्यात आला.
बारामती जि. पुणे येथे दि. २० एप्रिल २०२५ रोजी गदिमा सभागृहात भीमपुत्र आयडॉल-२०२५ या कार्यक्रमांमध्ये डॉ. नरेंद्र जाधव (ज्येष्ठ अर्थतज्ञ, माजी राज्यसभा खासदार आणि कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे आणि माननीय खासदार सौ. सूनेत्रा अजितदादा पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात
या वेळी संपूर्ण देशभरातून विविध क्षेत्रात उत्तुंग काम करणाऱ्या, बारा सन्माननीय व्यक्तींचा भीमपुत्र आयडॉल-२०२५ हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन संविधान विचार मंचाचे अध्यक्ष आयु. राजेश कांबळे सचिव श्री. घनश्याम केळकर आणि संस्थेचे सन्माननीय सदस्य यांनी आयोजित केला होते. सदर कार्यक्रमासाठी संपूर्ण बारामती शहरात पुरस्कारार्थींचे पोस्टर्स लावून स्वागत करण्यात आले
पुरस्कार वितरणाच्या वेळी संबंधित पुरस्कारार्थीच्या कामाबाबतची ऑडिओ व्हिज्युअल क्लिप दाखवून त्यांच्या कामावर प्रकाशझोत सोडला जात होता. पुरस्कार प्राप्त मान्यवरांची नावे व त्यांचे विविध क्षेत्रातील कार्य लक्षात घेता त्या पुरस्काराचे महत्त्व लक्षात येते.