spot_img
spot_img

पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या 2795 पदांची भरती;

29 एप्रिलपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार

झुंजार सेनापती l सोमनाथ पाटील

राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागात ‘पशुधन विकास अधिकारी’ या संवर्गाची 2795 पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी उमेदवारांना 29 एप्रिल 2025 पासून 19 मे 2025 पर्यंत आपला अर्ज सादर करता येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे देण्यात आली आहे.

 राज्य शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या मागणीवरून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट-अ या संवर्गातील पदभरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत पशुसंवर्धन विभागात ‘पशुधन विकास अधिकारी’ या संवर्गाची 2795 पदे भरली जाणार आहेत. सामाजिक व समांतर आरक्षणानुसार पदांचा तपशील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करताना आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक त्या प्रमाणपत्रांची पूर्तता करणे बंधनकारक आहे.

Related Articles

दुष्काळावर मात करण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई मुंबई, दि. २६ : राज्यातील अपुऱ्या पावसामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेल्या ट्रिगर-१ आणि ट्रिगर-२ लागू असलेल्या ३०४ तालुक्यांतील प्रत्येक गावात...

‘तिसऱ्या मुंबई’त १५ लाख रोजगारांचे लक्ष्य!

⬤ झुंजार सेनापती l मुंबई रायगड-अलिबाग, दि. २५ : नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र अर्थात नैना परिसराच्या नियोजनबद्ध विकासातून १५ लाख रोजगारनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात...

ताज्या बातम्या

error: Content is protected !!