झुंजार सेनापती l नवी मुंबई
कोकण विभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या रेल्वे स्थानकावरील स्टॉलवर चहा, खाद्यपदार्थ व इतर वस्तूंची विक्री होत असते. सहनियंत्रक, वैधमापन शास्त्र कोकण विभागचे शिवाजी काकडे, यांच्या सूचनेवरून नूकतिच कारवाई करण्यात आली.
तसेच ठाणे जिल्हयातील कल्याण व ठाणे, पालघर जिल्हयातील वसई, रायगड जिल्हयातील पनवेल व कर्जत, रत्नागिरी जिल्हयातील चिपळूण व रत्नागिरी, सिंधुदूर्ग जिल्हयातील कुडाळ या रेल्वे स्टेशनवर संबंधित जिल्हा उपनियंत्रकांच्या मार्गदर्शनाखाली चहा, खाद्यपदार्थ व इतर वस्तूंची विक्री करणाऱ्या आस्थापनांवर अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या वैधमापन शास्त्र यंत्रणेतील निरीक्षकांनी अचानक भेटी देवून नूकतिच कारवाई करण्यात आली. वैधमापन शास्त्र अधिनियम २००९ मधील तरतूदीन्वये तपासणी केली.
रेल्वे स्टेशनवरील चहा विक्री करणाऱ्या आस्थापनांना १५०/१८० मिली एवढी घोषित प्रमाण असताना तपासणीमध्ये ३० ते ८० मिली एव्हढा चहा कमी देत असल्याचे आढळून आले. अश्या एकूण ७ आस्थापनांवर वैधमापन शास्त्र अधिनियम २००९ मधील तरतूदीन्वये प्रकरण दाखल करण्यात आले. वापरात असलेली तोलन उपकरणे विहित मुदतीत फेर पडताळणी व मुद्रांकन करून न घेतल्यामुळे ०४ प्रकरणे दाखल करण्यात आली. चिपळूण व रत्नागिरी स्टेशन वरील आस्थापनेवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आवेष्टित वस्तूवर नियमातील तरतूदीन्वये आवेष्टनावर घोषवाक्य नमूद न केल्यामूळे प्रकरण दाखल करण्यात आले आहे.अशी माहिती पत्रकान्वय कोकण विभागाचे सह नियंत्रक,वैध मापन शास्त्राचे शिवाजी काकडे यांनी दिली.