झुंजार सेनापती l मुंबई
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे वेव्हज-2025 परिषदेच्या उद्घाटन समारंभास उपस्थित राहण्यासाठी मुंबई विमानतळ येथे सकाळी आगमन झाले.
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, राजशिष्टाचार विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, पोलिस आयुक्त देवेन भारती आदी उपस्थित होते.